adar poonawalla file photo
देश

लहान मुलांसाठी लस कधी येणार? अदर पूनावालांनी दिलं उत्तर

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : सध्या जगावर ओमिक्रॉन (Omicron) या नव्या व्हेरियंटचं संकट आहे. आपल्या देशात ओमिक्रॉनचे ४० च्या जवळपास रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी निम्मे रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत. तसेच येत्या फेब्रुवारी महिन्यात तिसरी लाट येणार असल्याचा दावा संशोधकांकडून केला जात आहे. पण, अद्यापही आपल्या देशात लहान मुलांसाठी लसी (Vaccine For Children) कधी येईल? त्यांचं लसीकरण कधी होईल? याबाबत माहिती दिलेली नाही. त्याबाबतच आता सिरम सिरम इन्स्टिट्युटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी मोठी घोषणा केली आहे.

काही दिवसांपूर्वी ६ वर्षांच्या वरील मुलांवर कोव्हॅक्सीनची लशींची ट्रायल घेण्यात आली होती. मात्र, अद्याप लसीकरण सुरू करण्यात आलं नाही. देशात सिरमची कोव्हीशिल्ड लस सर्वाधिक लोकांना देण्यात आली आहे. त्यामुळे आता सिरमकडूनच लहान मुलांसाठी देखील लस लवकरच लाँच केली जाणार आहे. कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री या संस्थेने अदर पूनावाला यांना चर्चासत्रात आमंत्रित केलं होतं. यावेळी पूनावाला यांनी लहान मुलांवर कोवावॅक्स लसीच्या चाचण्या आणि त्याचे प्राप्त झालेले निष्कर्ष याबाबत माहिती दिली. ३ वर्ष आणि त्यावरील वयोगटासाठी येत्या ६ महिन्यात लस लाँच केली जाईल, असं पूनावाला यांनी सांगितलं आहे.

बूस्टर डोसमुळे मोठ्या प्रमाणात अँटीबॉडीज मिळतील? -

डेल्टा व्हेरियंटने भारतात धुमाकूळ घातला होता. यामध्ये सर्वाधिक मृत्यू झाले होते. त्यानंतर ओमिक्रॉन व्हेरियंटचं संकट आलं आहे. त्याचे ४० च्या जवळपास रुग्ण सापडले आहेत. महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, केरळ, कर्नाटक, दिल्ली, चंदीगढ, आंध्रप्रदेश आदी राज्यांमध्ये ओमिक्रॉनचे रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. लसीकरण झालेल्या नागरिकांना देखील या व्हेरियंटची लागण होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे नागरिकांना बूस्टर डोस देण्यात यावा अशी मागणी केली जात आहे. त्याबाबत सुद्धा पूनावाला यांनी वक्तव्य केलं आहे. बूस्टर डोसमुळे मोठ्या प्रमाणात अँटीबॉडीज मिळतील, असे काही डेटाच्या आधारे सिद्ध झाले आहे, असंही पूनावाला म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: दिल्लीच्या आंदोलनात पुन्हा हिंसा! तरुणांकडून दगडफेक; पोलिसांकडून लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या

Devala News : विवाहितेने दोन लहान मुलींसह गावाबाहेरच्या विहिरीत उडी टाकून संपविले जीवन

Sonam Wangchuk: रुग्णालयातून सोनम वांगचुक यांचा पहिला व्हिडिओ, सरकारला दिला 'असा' प्रस्ताव, भावनिक प्रतिक्रिया समोर

Pune Mechanical Parking Demolition: संभाजी उद्यानातील अडीच कोटींचे मेकॅनिकल पार्किंग जमीनदोस्त; महापालिकेचा लोखंडी सांगडा हटविण्याचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे

Mahagaon Bribe Case : अंगणवाडी मदतनीस नियुक्तीसाठी लाचेची मागणी; महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT