Lal Krishna Advani 
देश

Lal Krishna Advani: लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती बिघडली! खासगी रुग्णालयात उपचार सुरु

रात्री ९ वाजण्याच्या सुमारास त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : भाजपचे ज्येष्ठ नेते लाल कृष्ण अडवाणी यांची प्रकृती अचानक बिघडल्यानं त्यांना दिल्लीच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती सध्या स्थिर असून डॉक्टरांच्या निगराणीखाली त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. (Veteran BJP leader Lal Krishna Advani admitted to Apollo Hospital due to bad health condition)

एएनआयच्या माहितीनुसार, अडवाणी यांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्यानं रात्री ९ वाजण्याच्या सुमारास दिल्लीच्या अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉ. विनीत सुरी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. पण त्यांना नेमका काय त्रास होत आहे हे अद्याप कळू शकलेलं नाही.

दरम्यान, गेल्याच आठवड्यात अडवाणी यांच्यावर एम्स रुग्णालयात उपचार सुरु होते त्यानंतर प्रकृती स्थिर झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. वयानुसार सुरु झालेल्या प्रकृती अस्वास्थ्यामुळं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं सांगण्यात आलं होतं. लालकृष्ण अडवाणी यांचं वय ९६ वर्षे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT