Ayodhya Ram Mandir Esakal
देश

Ayodhya Ram Mandir: रामलल्लाचं दर्शन घ्यायला गेली पुण्यातील चिमुरडी; डोक्यावर मावळा पगडी घातलेला व्हिडिओ होतोय व्हायरल

Ayodhya Ram Mandir: भव्य आणि ऐतिहासिक प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर आज अयोध्येतील श्रीराम मंदिर हे सर्वसामान्यांसाठी खुलं करण्यात आलं आहे. कालपासून अयोध्देमध्ये भक्तांची मोठी गर्दी उसळली आहे. यामध्ये पुण्यातील एका चिमुकलीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

भव्य आणि ऐतिहासिक प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर आज अयोध्येतील श्रीराम मंदिर हे सर्वसामान्यांसाठी खुलं करण्यात आलं आहे. कालपासून अयोध्देमध्ये भक्तांची मोठी गर्दी उसळली आहे. यामध्ये अगदी लहानांपासून वयोवृध्दांपर्यंत सर्वांचा समावेश आहे. कालपासून या गर्दीमधील रामलल्लाच्या एका वर्षाच्या एका चिमुकल्या भक्ताने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

अयोध्येत श्री राम मंदिरात दर्शन करण्यासाठी आलेल्या महाराष्ट्रातील पुण्यातील रामलल्लाच्या एका वर्षाच्या भक्ताचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. काल राममंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या दिवशी कुटुंबासह आलेल्या या मुलीला प्रचंड गर्दीमुळे मंदिर परिसरात प्रवेश करण्याची संधी मिळाली नाही. आज कुटुंबाने दर्शन घेण्याचा बेत आखला आहे.

आज 'एएनआय'शी बोलताना त्या चिमुकलीच्या वडीलांनी सांगितले की, "आम्ही काल इथे (अयोध्देत) आलो. आम्हाला खूप छान वाटतंय. आम्हाला प्रचंड गर्दीची काळजी नाही, आम्हाला फक्त राम लल्लाचं दर्शन घ्यायचं आहे".

तिच्या वडिलांच्या खांद्यावर बसून टाळ्या वाजवताना व्हिडीओ व्हायरल

एएनआय या वृत्तसंस्थेने काल(सोमवारी) शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ही चिमुकली तिच्या वडिलांच्या खांद्यावर बसून टाळ्या वाजवताना दिसत आहे. मुलीच्या वडिलांनी एएनआयला सांगितले, आम्ही काल येथे आलो. आम्हाला खूप छान वाटत आहे. आम्हाला प्रचंड गर्दीची काळजी नाही; आम्हाला फक्त राम लल्लाला बघायचे आहे.

काल(सोमवारी) अयोध्येत राम लल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची सांगता झाल्यानंतर आज(मंगळवारी) दर्शनासाठी राम मंदिरासमोर भाविकांची मोठी गर्दी झाली. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर पहाटे तीन वाजल्यापासूनच भाविकांनी रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती. अयोध्येतील भव्य राम मंदिर आजपासून सर्वसामान्यांसाठी खुले करण्यात आले आहे.

तर या व्हिडीओमध्ये चिमुकलीने आणि तिच्या वडिलांनी मराठमोळा पेहराव केला आहे. डोक्यावर मावळा पगडी परिधान केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Municipal Corporation Protest: जंतर-मंतर आंदोलनाचे महापालिकेत पडसाद; सत्ताधारी-विरोधकांमध्ये घोषणाबाजी

Harmony Park: संगीताच्या सुरांमध्ये योगा आणि खेळ, ५० रुपयांच्या तिकिटात स्वप्नवत सफर! ३०० टन भंगारातून साकारल्या कलाकृती

Latest Marathi News Live Update : न्यायालयाने डॉ. मनोज शिरुरे यांचा जामीन अर्ज फेटाळला

सुबोध भावेने साकारली गोंदवलेकर महाराजांची भूमिका, अभिनेत्याबद्दल अनुभव सांगताना अर्थव सुदामे म्हणाला... 'त्यांनी पैसे...'

NEET ते TET... 2024 मध्येच कायदा आला, तरी पेपरफुटी थांबली नाही; सरकारकडे उत्तर आहे का? नवीन कायदा कशासाठी? Fact Explained...

SCROLL FOR NEXT