Lalu Prasad Yadav and Narendra Modi 
देश

कंसानेही गरोदर मातेला त्रास दिला, त्याचं...; ईडीच्या रेडवर लालूंच्या लेकीचा भाजपला इशारा

सकाळ डिजिटल टीम

पाटणा : राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांची कन्या रोहिणी आचार्य यांनी केंद्र सरकारवर कुटुंबाला त्रास देण्याचा आरोप केला आहे. लालूंच्या लेकीने एकापाठोपाठ ट्विट करत केवळ लालू यांच्या कुटुंबीयांना मजबूर करण्याचा प्रयत्न होतोय, असा आरोप रोहिणी यांनी केला.

रोहिणी यांनी म्हटलं की, निचतेची हद्द पार केली तरी, आम्ही आमच्या धाडसाने तुमच्या इराद्यांना धुळीत मिळवू कारण आम्ही लालूवादी आहोत.

रोहिणी आचार्य यांनी ट्विट केले की, 'आम्ही हा अन्याय लक्षात ठेवू. हे सर्वांच्या लक्षात राहिल. बहिणीच्या लहान मुलाने काय गुन्हा केला आहे? गरोदर वाहिनीने कोणता गुन्हा केला? प्रत्येकवर अन्याय केला जातोय. आज सकाळपासून सर्वांना त्रास देण्यात येतोय. या लोकांचा एकच गुन्हा आहे की, हे फॅसिस्ट आणि दंगेखोरांसमोर नाहीत.

एक कविता ट्विट करत रोहिणी म्हणाल्या की, भाजप सरकार का हिटलर शाही फरमान है, ईमान बेचने का पैगाम है, मगर झुकने को तैयार नहीं बिहारी माटी का जो लालू तेजस्वी लाल है... हीं झुका लालू- राबड़ी परिवार. तुमलोगों के इस अन्याय का जवाब वक्त आने पर मिलेगा. अब यह सब बर्दाश्त से बाहर है.

कंसाने गरोदर मातेचा अपमान केला होता, मग कंसाचे काय झाले हे सर्वांना ठावूक आहे. तुम्हाला कंसाची आठवण झालीच पाहिजे. तुमचीही वेळ जवळ आली आहे, असा इशारा रोहिणी यांनी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Bra Viral Photo : असावा एखादा छंद! महिला खासदाराच्या घरात ५ कोटी कॅश, २७ किलो सोन्याचे ब्रा, अंडरवियर सापडले?; पोलिसांनी धाड टाकली अन्

Pune Crime : ‘एपीआय’ला मारहाण केल्याप्रकरणी पोलिस हवालदार निलंबित

Shriram Rajurkar Passes Away : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते श्रीराम पाटील राजुरकर यांचे निधन; नांदेडच्या ग्रामीण राजकारणातील एक संयमी, विकासाभिमुख नेतृत्व हरपले

Maharashtra Rain Alert : मुंबईत दुसऱ्या दिवशीही मुसळधार पाऊस सुरुच, रायगड, पालघरमध्ये शाळांना सुट्टी; रेड अलर्ट जारी, पुढील ४ दिवस धोक्याचे

पोलिस उपायुक्तांचे आदेश! ट्रॅफिक पोलिस नेमलेल्या ठिकाणीच असणे बंधनकारक; ‘HSRP’ नंबरप्लेट नसलेल्या वाहनांवर ‘आरटीओ’ करणार कारवाई; रिक्षा चालकांना ड्रेसकोडचे बंधन

SCROLL FOR NEXT