Raj Thackeray Sakal
देश

माझ्या आजोबांचा काय संबंध? राज ठाकरेंनी दिलं शरद पवारांना प्रत्युत्तर

​ ब्रिजमोहन पाटील

पुणे : मी प्रबोधनकार ठाकरे वाचलेत आणि यशवंतराव चव्हाण पण वाचले आहेत. पण माझ्या वक्तव्याचा आणि प्रबोधनकारांचा काय संबंध? असे म्हणण्याचा पवारांचा काय संबंध? प्रबोधबकार ठाकरे यांचा दाखला देत आहेत पण ते तुम्हालाही परवडणारे नाहीत, अशा शब्दात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्यावर शरद पवारांनी केलेल्या टीकेचा समाचार घेतला.

पुण्यातील मनसेच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषद राज ठाकरे यांनी संवाद साधला. आपण गेल्या ७४ वर्षात जाती पातीत खितपत पडलो आहोत अजूनही रस्ते, वीज पाणी देऊ म्हणत असेल तर काय कमावलं? १९९९ पर्यंत जातीवाद होता, जातीचा अभिमान होता. १९९ नंतर राष्ट्रवादीच्या जन्मानंतर दुसऱ्या जादीचा द्वेष अधिक वाढला आहे. हे सगळ्यांना माहिती आहे पण फक्त बोललो, असेही ठाकरे यांनी सांगितले. गेल्या १५ वर्षात शाळा कॉलेज मित्र मैत्रिणीत सुद्धा जाती बघून केल्या जातात. इथपर्यंत हा द्वेष खाली आला आहे. पूर्वी काही नव्हते.

निवडणुकीसाठी जात आणू पण त्याचे दूरगामी परिणाम काय होतील याची कल्पना आहे का? मराठा तरुणाचे मोर्चे का निघाले आरक्षण मिळणार नाही हे सांगा ना त्यांना? तरुणांचे माथी भडकविण्याचा प्रयत्न सुरू आहे. २०१४ ला मोदी पंतप्रधान झाले तेव्हा विकासाच्या मुद्य्यावर लोकांनी मतदान झाले होते. हे लक्षात घ्यायला हवे. बाबासाहेब पुरंदरे हे इतिहास संशोधाक आहेत म्हणून मी त्यांच्याकडे जातो. ब्राह्मण म्हणून नव्हे. बाबासाहेब पुरंदरे चुकीचा इतिहास लिहिला गेला इतक्या वर्षात कळलं नाही आता बरे कळले. आपण वाचायचे नाही चुकीचे लिहिले म्हणून टीका करायची. जेम्स लेन कोण? प्रकरणात आग कुणी लावली. हे सगळं वेल डिझाईन आहे. जाती जातीत तेढ निर्माण करायचा आहे. जातीचे संदर्भ देऊन ऐतिहासिक संदर्भ सांगणं काही सबमध आहे का? महाराष्ट्राला खेळवल जात आहोत. जनतेने समजून घ्यावे. महापालिका निवडणूक म्हणून राज ठाकरे यांचे पुणे दौरे वाढले आहेत, जेव्हा येत नव्हतो तेव्हा येत नाहीत , वा रे वा..अशी मिशकील टिप्पणी राज ठाकरे यांनी केली.

काय म्हणाले राज ठाकरे?

- निवडणुकांतील वार्डनिहाय आरक्षणामध्ये स्त्री-पुरुष इतकंच आरक्षण असायला हवं.

- नीरज चोप्रा मेडल जिंकल्यावर मराठा असल्याचं आठवलं.

- मी काय वाचतो आणि मी काय वाचलंय, हे माझं मला, माझ्या पक्षाला आणि लोकांना माहितीय. मला मोजायचा प्रयत्न करु नये.

- पहिली गोष्ट प्रबोधनकार ठाकरे तुम्हालाही परवडणार नाहीत. प्रबोधनकारांना मध्ये आणयाचंच असेल तर तुम्हालाही ते परवडणारे नाहीत.

- चुकीचा इतिहास लिहला गेलाय तर खरा इतिहास सांगा ना काय लिहला गेलाय. ५० साली पहिली आवृत्ती लिहली गेलीय. तर आजवर खरा इतिहास का नाही समोर आला.

- बाबासाहेब पुरंदरेकडे मी ब्राह्मण म्हणून जात नाही तर इतिहास संशोधक म्हणून जातो.

- पवारांच्या भेटीला जाताना मराठा म्हणून जात नाही.

- महाराष्ट्र जागा व्हावा, पुन्हा पुन्हा त्याच जातीच्या चिखलात राजकारण व्हावं, असं मला वाटत नाही. त्यातून बाहेर पडावं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Airport Threat : पुणे विमानतळावर हाय अलर्ट! गुवाहटीला जाणाऱ्या विमानात आढळली धक्कादायक चिठ्ठी, प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण, तपास सुरू

Marathi literature decade review : ‘दशकातले लेखक’; २०१०-२०२० मधील मराठी साहित्यप्रवाहाचा सखोल वेध

Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंनी उपोषण सोडल्यानंतर पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; माझ्या घातपाताचा प्रयत्न कुणी केला?

Prize Money: IPL 2026 चा विजेता होणार मालामाल! चॅम्पियन संघाला मिळणार 'इतके' कोटी रुपये, तर उपविजेत संघालाही मिळणार 'इतके' कोटी

Mumbai Goa Highway Accident: ट्रकवर मोटार आदळून अहिल्यानगरच्या माय-लेकी ठार; मुंबई-गोवा महामार्गावर पोलादपूरजवळ अपघात, बाप-लेक जखमी

SCROLL FOR NEXT