B.S. Patil 
देश

B.S. Patil : BJP आमदाराच्या मुलाकडून कोट्यवधी रुपये जप्त; कारवाई करणारे लोकायुक्त पाटील कोण?

सकाळ डिजिटल टीम

बेंगळुरू : निवडणुका तोंडावर आल्या असताना कर्नाटकात आज एक खळबळजनक घटना उघडकीस आलीये. बेंगळुरू येथे जल आपूर्ती आणि सीवरेज बोर्डचे (BWSSB) मुख्य लेखापाल प्रशांत मदल यांना कर्नाटक लोकायुक्तच्या अधिकाऱ्यांनी 40 लाखांची लाच घेताना रंगेहात अटक केली. त्यानंतर लोकायुक्तांनी टाकलेल्या छापेमारीत सहा कोटी रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली.

छापेमारीची कारवाई लोकायुक्त बी.एस.पाटील यांनी केली असून कारवाईनंतर ते चर्चेत आले आहेत. लोकायुक्त पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांतने ८० लाख रुपयांची लाच मागितली होती. काल प्रशांतकडून तीन बॅगमध्ये ४० लाखांची रोकड जप्त करण्यात आली होती. प्रशांत एका कंत्राटदाराकडून लाच घेताना पकडला गेला. या प्रकरणी 80 जणांना अटक करण्यात आली आहे.

कर्नाटक उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती भीमनगौडा सांगनगौडा पाटील यांची कर्नाटकचे नवे लोकायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी ते उपलोकायुक्त म्हणून कार्यरत होते, त्यांना कर्नाटकच्या लोकायुक्त पदावर बढती देण्यात आली होती.

१९५६ मध्ये जन्मलेले बी. एस. पाटील यांनी १९८० मध्ये कनिष्ठ न्यायालय आणि उच्च न्यायालयात वकील म्हणून प्रॅक्टिस केली. कर्नाटकचे लोकायुक्त बी. एस. पाटील म्हणाले की, आरोपींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती. आम्ही गुन्हा दाखल करण्यासाठी आलो होतो.

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना या धाडीबाबत विचारले असता ते म्हणाले की, आता सर्व काही लोकायुक्तांसमोर आहे, त्यांच्या कडून स्वतंत्र आणि न्याय्य चौकशी होऊ द्या. हा पैसा कोणाचा आहे? ते कोणासाठी आणले होते? या सर्व प्रश्नांची उत्तरे समोर येऊ द्या. सत्य बाहेर यायला हवे, म्हणूनच आम्ही लोकायुक्तांची निर्मिती केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Snake in Grapes Farm : शेतकऱ्याच्या काळजाचा ठोकाच चुकला! द्राक्ष वेलीवर वेटोळे घालून बसलेल्या नागाला पाहून काळजाचं पाणी झालं; पाहा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ..

Arvind Kejriwal : दिल्लीतील मद्य घोटाळ्याच्या आरोपातून निर्दोष मुक्ततेनंतर अरविंद केजरीवाल यांना अश्रू अनावर; म्हणाले- सत्याचाच विजय झाला

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये ४०० कोटींच्या कथित अपहरण प्रकरणात मोठी घडामोड

Satej Patil Hasan Mushrif Vinay Kore Alliance : सतेज पाटील, मुश्रीफ, विनय कोरे एकत्र येणार?, झेडपीतील पाडापाडीमुळे ‘गोकुळ’च्या राजकारणाला उकळी

प्रतीक्षा संपली ! स्टार प्लसचा बहुप्रतीक्षित शो "तारा" १० मार्चपासून रात्री ८ वाजता येणार प्रेक्षकांच्या भेटीला!

SCROLL FOR NEXT