Bangladeshi adult actress Riya Barde arrested sakal
देश

बन्ना शेख बनली रिया बर्डे...'त्या' बांगलादेशी पॉर्न स्टारबद्दल धक्कादायक खुलासा; राज कुंद्राशीही आहे कनेक्शन

Riya Barde adult content case : ठाणे येथून अटक झालेल्या पॉर्न स्टार महिलेबद्दल पोलिस तपासात अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत.

रोहित कणसे

ठाणे येथून अटक झालेल्या पॉर्न स्टार महिलेबद्दल पोलिस तपासात अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. पोलिसांनी सांगितेल की ही महिला एक बांगलादेशी मॉडेल असून ती आपल्या कुटुंबासह बांगलागेशातून पश्चिम बंगालमध्ये आली होती आणि नंतर मुंबईजवळच्या भागात ती रिया बर्डे या नावाने राहायला लागली. या महिलेचे खरे नाव बन्ना शेख असे आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही महिला आपली आई रुबी शेख, बहिण मोनी शेख आणि भाऊ रियाझ शेख यांच्यासह घुसखोरी करून पश्चिम बंगालमध्ये आली होती. इतकेच नाही तर भारतात आल्यानंतर रूबी शेख हिची ओळख महाराष्ट्रातील अमरावती येथे राहाणाऱ्या अरविंद बर्डे याच्याशी झाली आणि त्यानंतर रुबी शेख आणि अरविंद बर्डे यांनी लग्न केले. त्यानंतर हा बांगलादेशी मुस्लीम परिवार हिंदू बनला.

यापैकी रूबी शेख, अंजरली बर्डे बनली तर बहिण मोनी शेख रितू बर्डे बनली भआऊ रियाझ शेख रविंद्र बर्डे बनला आणि ही महिला स्वतः बन्ना शेख हे नाव बदलून रिया बर्डे बनली. इतकेच नाही तर या संपूर्ण कुटुंबाने याच नावांनी आपले आधार कार्ड, पासपोर्ट आणि वोटर आयडी कार्ड देखील तयार करून घेतले. याशिवाय लग्नानंतर रुबी शेख कतार येथे गेली आणि तिची मुलगी भारतात पॉर्न व्हिडीओंमध्ये काम करू लागली.

राज कुंद्राच्या प्रोडक्शन हाऊससाठी देखील केलं काम

आरोप आहे की बांगलादेशी मॉडेलने अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राच्या प्रोडक्शन हाऊससाठी देखील काम केले होते. राज कुंद्राचे हे प्रॉडक्शन हाऊस अडल्ट चित्रपट बनवत असे. या प्रकरणी राज कुंद्राला अटक देखील झाली होती.

विशेष म्हणजे मुंबई पोलिसांनी या महिलेला वैश्याव्यवसायच्या आरोपाखाली एकदा अटक देखील केली होती. पण तेव्हा तिच्याकडे सर्व डॉक्युमेंट्स असल्याने पोलिस देखील फसले आणि त्यांना रिया बर्डे ही बन्ना शेख असल्याचे लक्षात आले नाही. अखेर या मॉडेलच्या एका मित्राने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तिला अटक केले आणि सध्या तिच्या भावाचा शोध घेतला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS तुकाराम मुंढेंना मातृशोक, पुण्यात आईचं निधन; बीडमध्ये होणार अंत्यसंस्कार

Latest Marathi News Live Update : दक्षिण रायगडमध्ये ढगाळ वातावरण; जोरदार वाऱ्यांसह अवकाळी पावसाचा इशारा

Satara District Bank: राज्य सरकारकडून सातारा जिल्हा बँकेच्या भरतीला स्थगिती; भरती प्रक्रियेत गैरव्यवहार, कायदेशीर लढ्याला यश!

Karad News: अतिक्रमणे हटवली; हॉकर्स झोन करा, कऱ्हाडला हातगाडाधारक आग्रही; किरकोळ विक्रेत्यांसाठी नियोजनबद्ध जागेची मागणी

IPL 2026: अजिंक्य रहाणेच्या उत्तरानंतर ग्रीनने घेतला बॉल हातात, KKR साठी गोलंदाजीला आजच उतरणार?

SCROLL FOR NEXT