Rahul Gandhi's flying kiss controversy Sakal
देश

Rahul Gandhi: राहुल गांधी ५० वर्षाच्या म्हातारीला फ्लाईंग किस का देतील? काँग्रेस महिला नेत्याचे अजब विधान

Rahul Gandhi's flying kiss controversy: काँग्रेसच्या महिला आमदाराच्या वक्तव्यावर भाजपने टीका केली आहे.

राहुल शेळके

Rahul Gandhi's flying kiss controversy: संसदेत अविश्वास प्रस्तावावरील चर्चेदरम्यान काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना फ्लाइंग किस दिल्याच्या कथित वादात आता नव्या वादाची भर पडली आहे.

राहुल गांधींना फ्लाइंग किस देण्यासाठी मुलींची कमतरता नाही, असे अजब विधान बिहारमधील काँग्रेस आमदार नीतू सिंह यांनी केले आहे. जर त्यांना एखाद्याला फ्लाइंग किस द्यायचे असेल तर ते स्मृती इराणींसारख्या ५० वर्षांच्या वृद्ध म्हातारीला का देतील?

नीतू सिंह यांच्या वक्तव्याचा भाजप नेत्यांनी निषेध केला आहे. नीतू सिंह यांच्या वक्तव्याचा निषेध करत भाजपचे प्रवक्ते गौरव भाटिया यांनी हे लज्जास्पद असल्याचे म्हटले आहे.

केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सभागृहात 'फ्लाइंग किस' करुन महिला खासदारांशी असभ्य वर्तन केल्याचा आरोप केला होता. इराणी यांनी राहुल गांधींना मिसोगॅनिस्ट देखील संबोधले.

संसदेतील भाषणादरम्यान केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला आणि म्हणाल्या, असे संसदेत यापूर्वी कधीही पाहायला मिळाले नाही. यावरून ते स्त्रियांबद्दल काय विचार करतात हे दिसून येते. ही असभ्यता आहे.

त्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) महिला खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेऊन राहुल गांधींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

तृणमूलच्या खासदार महुआ मोइत्रा यांनी स्मृती इराणींना टोला लगावत ब्रिजभूषणवर गप्प का? भाजपच्या एका खासदारावर आमच्या कुस्तीपटूंनी छेडछाड केल्याचा आरोप केला तेव्हा आम्ही महिला आणि बालविकास मंत्री यांचे एकही शब्द ऐकले नाही आणि आता त्या फ्लाइंग किसबद्दल बोलत आहेत.

दिल्ली महिला आयोगाच्या प्रमुख स्वाती मालीवाल यांनी सांगितले की, केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री प्रचंड संतापल्या आहेत. पण संसदेत ब्रिजभूषण सिंग नावाची व्यक्ती त्यांच्या मागे रांगेत बसलेली असताना त्यांचा राग कुठे जातो हे मला समजत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : महापूजेवेळीही भाविकांसाठी श्री विठ्ठलाचे मुखदर्शन सुरू; पदस्पर्श दर्शनाची रांग मंदिरापासून 20 किमी अंतरावर, पंढरपुरात 30 लाखांहून अधिक भाविकांचा महापूर

What is The Significance Of Pandharpur Wari? पाऊले चालती पंढरीची वाट...

Pandharpur Ashadhi Ekadashi : "बा विठ्ठला, राज्यातील प्रत्येक शेतकरी सुखी राहू दे..."; शासकीय महापूजेनंतर CM फडणवीसांचे पांडुरंगाला साकडे

Ashadhi Ekadashi Mahapuja : '20 वर्षे एकही वारी चुकवली नाही...'; मुख्यमंत्री फडणवीसांसोबत शासकीय महापूजेचा कोणाला मिळाला मान? धाराशिवमधील शेतकरी दाम्पत्य आहे तरी कोण?

Pandharpur Ashadhi Ekadashi Live Updates : CM देवेंद्र-अमृता फडणवीसांच्या हस्ते विठूरायाची महापूजा; मुख्यमंत्र्यांनी काय मागितलं मागणं?

SCROLL FOR NEXT