Let's ban RSS branches Congress 
देश

आरएसएसच्या शाखांवर बंदी घालू : काँग्रेस

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : काँग्रेस राज्यात आल्यास शासकीय इमारती आणि परिसरात लागणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) शाखांवर बंदी घालू, असे आश्वासन पक्षाने आपल्या जाहीरनाम्याच्या माध्यमातून दिले. काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील या आश्वासनानंतर सत्ताधारी भाजपकडून संताप व्यक्त केला जात आहे. 

मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजप-काँग्रेसकडून आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. त्यानंतर काँग्रेसकडून जाहीरनामा नुकताच प्रसिद्ध करण्यात आला. या जाहीरनाम्यात काँग्रेसने आरएसएसच्या शाखांवर बंदी घालू असे आश्वासन दिले. जाहीरनाम्यातील काँग्रेसच्या या आश्वासनानंतर भाजप संतप्त झाला आहे. तसेच काँग्रेसने या जाहीरनाम्यामध्ये आरएसएसच्या शाखांवर बंदी घालण्यासोबतच सरकारी कर्मचाऱ्यांना शाखेमध्ये भाग घेण्याबाबतचा आदेशही रद्द करण्यात येईल, असेही म्हटले आहे.

दरम्यान, ''सध्या काँग्रेसचा एकच उद्देश आहे, तो म्हणजे 'मंदिर बनू देणार नाही आणि शाखा चालू देणार देणार नाही'', अशा शब्दांत भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी काँग्रेसवर निशाणा साधला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Krishnaraj Mahadik : मनसेच्या चोरांना भाजपच्या पोरांनी जशास तसं प्रत्युत्तर दिलं, भाजप युवा नेते कृष्णराज महाडिकांची मनसेला वॉर्निंग

Jalgaon Bypass Flyover Collapse : खर्च वाचविण्यासाठी वाहनधारकांच्या जिवाशी खेळ; अपघातांमागे 'बायपास'चे निकृष्ट काम; कंत्राटदारावर थेट गुन्हा दाखल

OBC Creamy Layer : केंद्र सरकारला झटका ! ओबीसी क्रिमी लेयरवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; UPSC सह १८ राज्यांतील भरतीवर परिणाम?

होलसेल बदलामागचं लॉजिक काय? Shahid Afridi ने पाकिस्तान संघाचे वाभाडे काढले; म्हणाला, ट्वेंटी-२० तील खेळाडू कसोटी संघात...

Marathi News Live Updates : वडिगोद्री येथे सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर रस्ता रोको; मराठा समाज बांधव आक्रमक

SCROLL FOR NEXT