woman climbs tower in madhya pradeshs shivpuri
woman climbs tower in madhya pradeshs shivpuri  
देश

"मला माझ्या प्रियकराची भेट घडवा..."; महिलेचा टॉवरवर चढून हाय-व्होल्टेज ड्रामा

सकाळ डिजिटल टीम

शिवपुरी - मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यातील मगरोनी पोलिस स्टेशन अंतर्गत एक अतिशय नाट्यमय प्रकरण समोर आले आहे. येथे पानघाटा गावातील एका विवाहितेने टॉवरवर चढून प्रियकराला बोलावण्याची मागणी केली. यावेळी महिलेने सुमारे 3 तास गोंधळ घातला.

मोठ्या कष्टाने पोलिसांनी तिला खाली आणले. मात्र, महिलेला टॉवरवरून खाली उतरवण्यासाठी पोलिसांना सुरक्षा आणि खबरदारीच्या दृष्टीने अनेक बंदोबस्त ठेवावा लागला. 9 सदस्यांच्या टीमने 3 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर महिलेला टॉवरवरून खाली उतरवले.

मिळालेल्या माहितीनुसार, मगरोणी चौकीतील पानघंटा गावातील एका विवाहितेने गावातील पॉवर हाऊसच्या टॉवरवर चढून प्रियकराशी पुन्हा भेट घडवून आणण्याची मागणी केली. जर तिच्या प्रियकराला बोलावले नाही तर ती टॉवरवरून खाली येणार नाही. यावेळी पोलिस आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या समजूतीनंतरही महिला ठाम होती.

महिला ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने एसडीआरएफ टीमला पाचारण करावे लागले. ती खाली उतरली तर तिच्या प्रियकराला बोलावले जाईल, असे आश्वासन महिलेला देण्यात आले. या आश्वासनानंतर महिला टॉवरवरून खाली आली. साडेतीन तासांहून अधिक काळ ती महिला टॉवरवर चढून राहिली आणि यादरम्यान खाली असलेले सर्वजण काळजीत पडले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sonia Gandhi : ''माझं लेकरु तुम्हाला सोपवत आहे... तो तुम्हाला निराश करणार नाही'', सोनिया गांधी भावुक

Lok Sabha Election 2024 : ‘ते’ राममंदिरावर बुलडोझर घालतील; पंतप्रधान मोदींची ‘सप’, ‘काँग्रेस’वर टीका

Parveen Hooda : ऑलिम्पिकपूर्वी भारताला मोठा धक्का; परवीन हुड्डा पॅरिस ऑलिम्पिक कोटा गमावणार?

Arvind Kejriwal: ईडीच्या कारवाईबाबत केजरीवालांचं पुढे काय होणार? सुप्रीम कोर्टानं राखून ठेवला निकाल

Shashank & Gashmeer : शशांक-गश्मीरची पुन्हा जमली जोडी; 'या' प्रोजेक्टमध्ये करणार एकत्र काम

SCROLL FOR NEXT