Woman killed for alcohol drinking in Gurdwara premises crime Patiala esakal
देश

Crime News : गुरुद्वाराच्या परिसरात मद्यपान केल्याबद्दल महिलेची हत्या

गुरुद्वाराच्या परिसरामध्ये मद्यप्राशन केल्याचा आरोप असलेल्या एका महिलेची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली

सकाळ वृत्तसेवा

पतियाळा : गुरुद्वाराच्या परिसरामध्ये मद्यप्राशन केल्याचा आरोप असलेल्या एका महिलेची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी याप्रकरणी आरोपीला अटक केली असून तिच्या कृत्यामुळे आपल्या धार्मिक भावना दुखावल्या होत्या त्यामुळेच आपण हा निर्णय घेतल्याचे आरोपीने पोलिसांना सांगितले.

परविंदर कौर (वय ३०) असे या महिलेचे नाव असून दुख निवारण साहिब गुरुद्वाराजवळ असलेल्या पवित्र तलावाच्या शेजारी बसून त्या मद्यप्राशन करत होत्या असा दावा आरोपीकडून करण्यात आला आहे.

निर्मलजितसिंग सैनी या आरोपीने आपल्या परवाना असलेल्या पिस्तुलातून परविंदर कौर यांच्यावर गोळ्या झाडल्या. सैनी हा प्रॉपर्टी डिलर असून त्याच्याविरोधात याआधी कसल्याही प्रकारच्या गुन्ह्याची नोंद नाही. दुखनिवारण साहिब गुरुद्वाराच्या जलशयानजीक परविंदर कौर या मद्यप्राशन करताना आढळून आल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT