Delhi Crime 
देश

Delhi Crime : घराबाहेरच महिलेची गोळ्या घालून हत्या; आरोपी अन् महिला...

रवींद्र देशमुख

नवी दिल्ली - दिल्लीतील डाबरी परिसरात महिलेची एका व्यक्तीने तिच्या घराबाहेरच गोळ्या घालून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपीला पकडण्यासाठी पोलिस घटनास्थळी दाखल होताच, आरोपीने आपल्या घरात स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली.

माहिती मिळताच डाबरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविला. मृत रेणू गोयल आपल्या कुटुंबासह डाबरी येथे राहत होत्या. त्यांच्या पश्चात पती डीपी गोयल आणि दोन मुले असा परिवार आहे.

डीपी गोयल व्यावसायाने प्रॉपर्टी डीलर आहे. गुरुवार रात्री सुमारे सव्वा आठच्या दरम्यान रेनू गोयल घराबाहेर उभ्या होत्या. त्याचवेळी एक व्यक्ती तिथे आला. तो रेनू यांच्यासमोर थांबला अन् काही समजण्याआधीच त्याने गोळीबार सुरू केला. यावेळी आरोपीने रेणू यांच्यावर दोन गोळ्या झाडल्या.

गोळीबाराचा आवाज ऐकून कुटुंबीय बाहेर आले असता त्यांना रेणू रस्त्यावर पडलेल्या दिसल्या.कुटुंबीयांनी त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करून पोलिसांना कळवले. पोलीस येईपर्यंत रेणू यांचा मृत्यू झाला. आरोपीचे नाव आशिष (२३) असून तो मृत महिलेचा शेजारी असल्याचे निष्पन्न झाले.

त्यानंतर पोलीस घरी पोहोचण्यापूर्वीच आरोपी आशिषने घरात गोळी झाडून आत्महत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे दोघे एकमेकांना अनेक वर्षांपासून ओळखत होते आणि एकत्र जिम करायचे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Forest Department Demolition : आजारी आई, पत्नीवर शस्त्रक्रिया अन् दिव्यांग मुलगा...; कोल्हापुरात वनविभागाच्या जेसीबीने तीन कुटुंबांचे संसार मोडले, असं घडलं काय?

NCAP Rating : नवीन फीचर्स, 25 kmpl मायलेज अन् 5 स्टार सेफ्टी; Maruti Brezza का ठरतेय बेस्ट SUV?

Latest Marathi News Live Update : सुरक्षेच्या कारणास्तव नवी दिल्ली मेट्रो बंद; प्रवाशांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

Mumbai Police: पोलिसाकडून महिला आंदोलकासोबत गैरवर्तन? विरोधकांचा आरोप, व्हायरल व्हिडिओनंतर पोलिसांचे स्पष्टीकरण

Ratnagiri Farmer Loan Waiver : रत्नागिरीतील 7,333 शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमुक्ती! पहिली यादी लवकरच प्रसिद्ध; पाहा ताजी अपडेट

SCROLL FOR NEXT