Women Reservation Bill 
देश

Women Reservation Bill: ऐतिहासिक क्षण! महिला आरक्षण विधेयक एक तृतियांशपेक्षा जास्त मतांनी लोकसभेत मंजूर

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- महिला आरक्षण विधेयक लोकसभेत मंजूर करण्यात आले आहे. एक तृतियांश पेक्षा जास्त मतांनी हे विधेयक मंजूर झाले. विधेयकाच्या बाजूने ४५४ मते पडली, तर विधेयकाच्या विरोधात दोन मते पडली आहे. चिठ्ठीद्वारे मतदान होऊन हे विधेयक मंजूर झाले. नारी शक्ती वंदन विधेयक लोकसभेत मंजूर झाल्याने महिलांना आता लोकसभा आणि विधानसभेत ३३ टक्के आरक्षण मिळेल.

नारी शक्ती वंदन विधेयक मंजूर झाल्याने हा एक ऐतिहासिक क्षण असल्याचं मानलं जात आहे. या विधेयकाला विरोधकांनीही पाठिंबा दिला होता. त्यामुळे विधेयक मंजूर होईल यात काही शंका नव्हती. चिठ्ठीद्वारे या विधेयकाबाबत मतदान घेण्यात आले. विधेयक लोकसभेत मंजूर झाले असल्याने आता ते राज्यसभेत मांडले जाईल. राज्यसभेत एनडीएचे बहुमत असल्याने तेथेही विधेयक मंजूर होण्यास अडचण येणार नाही.

नारी शक्ती वंदन विधेयकावर आज लोकसभेमध्ये चर्चा झाली. या विधेयकाबाबत काँग्रेस आणि भाजपमध्ये श्रेयवादासाठी आरोप-प्रत्यारोप झाल्याचं पाहायला मिळालं. महिला आरक्षण माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचे स्वप्न असल्याचं काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी म्हणाल्या. दुसरीकडे, भाजपने महिला आरक्षण आंदोलनाचे श्रेय गीता बॅनर्जी आणि सुषमा स्वराज यांना दिले.

विधेयक मंजूर झाल्याने आता लोकसभा आणि विधानसभेत महिलांना ३३ टक्के आरक्षण असेल. राज्यसभा आणि विधानपरिषदेमध्ये हे आरक्षण दिले जाणार नाही. तसेच या कायद्याचा लाभ महिलांना लगेच मिळणार नाही. २०२६ नंतर नारी शक्ती वंदन कायदा लागू होईल. त्यानंतर महिलांना आरक्षण मिळण्यास सुरुवात होईल. काँग्रेसने हे आरक्षण तत्काळ लागू व्हावी अशी मागणी केली होती.

मोदी सरकारने विशेष अधिवेशनाचे आयोजन केले होते. या अधिवेशनात कोणता महत्त्वाचा निर्णय घेण्यात येईल याबाबत विविध तर्कवितर्क लावले गेले. अखेर केंद्र सरकारने या अधिवेशनात महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याचे विधेयक आणले जाणार असल्याचे स्पष्ट केले. देशातील महिलांसाठी हा महत्वपूर्ण निर्णय असून राजकारणातील त्यांचे प्रतिनिधित्व आणि सहभाग वाढणार आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2025, RCB vs LSG: रिषभ पंतच्या लखनौसमोर आज धडाकेबाज बंगळुरू संघाचे पारडे जड आव्हान, कशी असेल Playing XI

Sports News: टी-२० विश्वकरंडक विजेत्या संजू सॅमसनला ICC पुरस्कार; मार्च महिन्यासाठी सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटू

Latest Marathi News Live Update: नीरव मोदीला भारतात आणलं जाणार, CBIचे अधिकारी लंडनमध्ये

Sports News: १७ वर्षांखालील मुलींचा विजय: महाराष्ट्राने सौराष्ट्र संघावर ८ गडी राखून मात; ईश्वरी अवसरेच्या अर्धशतकाने महाराष्ट्राच्या जिंकण्याची शर्यत मजबूत

Success Story: वडील वॉचमन, आई शिवणकाम करते; लेकीनं २०व्या वर्षी पूर्ण केलं खाकीचं स्वप्न!

SCROLL FOR NEXT