PM Modi Big Announcement On Womens Day sakal
देश

PM Modi Big Announcement On Womens Day: महिला दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचं मोठं गिफ्ट; LPG गॅस सिलेंडरवर 100 रुपयांची सूट

PM Modi Big Announcement On Womens Day: आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील महिलांना मोठी भेट दिली आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

PM Modi Big Announcement On Womens Day: आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील महिलांना मोठी भेट दिली आहे. महिलांना घरगुती गॅस सिलिंडरवर 100 रुपयांची सवलत दिली जाईल, अशी घोषणा त्यांनी केली आहे. पीएम मोदींनी ट्विट केले की, 'आज महिला दिनानिमित्त आम्ही एलपीजी सिलिंडरच्या किमतीत 100 रुपयांची सूट देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे महिला शक्तीचे जीवन तर सुसह्य होईलच शिवाय करोडो कुटुंबांचा आर्थिक भारही कमी होईल.हे पाऊल पर्यावरण रक्षणासाठीही उपयुक्त ठरेल, ज्यामुळे संपूर्ण कुटुंबाचे आरोग्य सुधारेल".

महिला दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांना मोठी भेट दिली आहे. आजपासून घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत १०० रुपयांनी कमी झाली आहे. पंतप्रधान मोदींनी आज सोशल मिडीयावर पोस्टद्वारे याची घोषणा केली आहे.

राजधानीत गॅस सिलिंडर फक्त 603 रुपयांना मिळणार

उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना 2024-25 या वर्षातही प्रति सिलिंडर 300 रुपये अनुदान सुरू ठेवण्याचा निर्णय केंद्राने घेतला आहे. सुमारे 10 लाख लाभार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे. त्यांना वर्षभरात 12 सिलिंडरवर सबसिडी मिळणार आहे. दिल्लीत एलपीजी सिलिंडरची किंमत 903 रुपये आहे परंतु योजनेअंतर्गत 603 रुपयांना सिलिंडर उपलब्ध होणार आहे.

यापूर्वी रक्षाबंधानिमित्त दिली होती २०० रूपयांची सूट

यापूर्वी सरकारने रक्षाबंधनानिमित्त घरगुती गॅस सिलिंडरची (१४.२ किलो) किंमत २०० रुपयांनी कमी केली होती. पंतप्रधान मोदींनी ओणम आणि रक्षाबंधन या सणांना भाव कमी करून भगिनींना मोठी भेट दिली आहे. याचा फायदा देशातील 33 कोटी ग्राहकांना होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant : ‘कोर्टाची दारे सर्वांसाठी खुली’: इंडिया आघाडीच्या नेत्यांना भेटीस नकार देत सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण

Gold Price Today: दसऱ्याआधी सोन्याचे भाव घसरले! ग्राहकांना मोठा दिलासा; आजचे 22, 24 कॅरेटचे दर पाहा

मृत्यू घासून गेला ! भरधाव कारने बाईकला उडवले... तरुण अलगद रस्त्यावर पडला, साधं खरचटलंही नाही, CCTV 13 second Video Viral

Nagpur News: तिसरा रिंगरोड ठरणार प्रगतीचा महाकॉरिडॉर!; १०७ गावांतून जाणार १४९ किमी मार्ग; रस्ता, मेट्रो अन् टाऊनशिपचे नियोजन

Kolhapur Gokul Election Latest News : 'काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांवर दगड मारू नयेत'; मुख्‍यमंत्र्यांवर आरोप करणाऱ्या सतेज पाटलांना चंद्रकांतदादांचा इशारा

SCROLL FOR NEXT