Ned Price Team eSakal
देश

राहुल गांधींचं 'ते' वक्तव्य असमर्थनीय; अमेरिकेने सुनावलं

मोदी सरकारवर टीका करणाऱ्या राहुल गांधींच्या वक्तव्याचा घेतला समाचार

सुधीर काकडे

काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी बुधवारी लोकसभेत (Loksabha) राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावादरम्यान केंद्रातील नरेंद्र मोदी (Narendra Modi) सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. राहुल गांधींनी (Rahul Gandhi) यावेळी केंद्रावर अनेक गंभीर आरोप केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कुचकामी धोरणांमुळं चीन आणि पाकिस्तानमधील एकी पूर्वीपेक्षा जास्त वाढली असल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यावर आता अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते नेड प्राइस (Ned Price) यांनी प्रतिक्रीया दिली आहे. पाकिस्तान आणि त्यांच्या पीआरसीशी असलेल्या संबंधांबद्दलचा विषय त्यांच्यावर सोडू, मात्र राहुल गांधींच्या या वक्तव्याचं समर्थन आपण करणार नाही असं नेड प्राइस म्हणाले.

नेड प्राइस परराष्ट्र मंत्री पुढे म्हणाले, राहुल गांधी यांनी लोकसभेत आरोप केला की, भाजप सरकारने पाकिस्तान आणि चीनला एकत्र आणण्याचं काम केलं. काँग्रेसने हे लक्षात ठेवलं पाहिजे की, 1963 मध्ये पाकिस्तानने बेकायदेशीररित्या शक्सगाम खोरे चीनला दिले. एवढंच नाही तर चीनने 1970 च्या दशकात पीओकेमधून काराकोरम हायवे बनवला होता. चीन आणि पाकिस्तानची मैत्री नवीन नाही, असंही ते म्हणाले.

दरम्यान, 1970 पासून दोन्ही देशांमध्ये घनिष्ठ अण्वस्त्र सहकार्य होतं. 2013 मध्ये चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर सुरू झाला. त्यामुळे राहुल गांधींनी स्वतःला विचारावं की चीन आणि पाकिस्तान दूर होते का? अशी खरमरीत टीका नेड प्राइस यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : पुण्यातील ‘रामा’ला कोण वाचविणार? आयुक्तांना दिलेल्या धमकीचा विरोधीपक्षाकडून निषेध

Asian Games: नीरु धंडानंतर भारताच्या महिला रिले संघालाही सुवर्णपदक! गुलवीरची हॅट्रिक, तर दिवसभरात भारताला ८ मेडल्स

Marathi News Live Updates: प्रियकराच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने दिला जीव

Cyber Loot : काही मिनिटांत खाते रिकामे; केरळमध्ये ७५० कोटींची सायबर लूट; डिजिटल अटक, बनावट पोलिस आणि ऑनलाइन गुंतवणुकीच्या आमिषातून फसवणूक

CSMT Mega Block : सीएसएमटीवर ७५ दिवसांचा ब्लॉक; आठ मेल-एक्स्प्रेस दादर, ठाण्यातच थांबणार, १ ऑक्टोबरपासून प्रवाशांना फटका

SCROLL FOR NEXT