polytechnic college
polytechnic college  
एज्युकेशन जॉब्स

दहावीनंतर पॉलिटेक्निकची प्रवेश प्रक्रिया बुधवारपासून सुरू

मिनाक्षी गुरव

पुणे : दहावी नंतरच्या पदविका (पॉलिटेक्निक) अभ्यासक्रमांच्या शैक्षणिक वर्ष २०२१-२२ करिता प्रवेश प्रक्रिया येत्या बुधवारपासून (ता.३०) सुरू होत आहे, अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ट्विटरद्वारे दिली आहे. (Admission process of Polytechnic after SSC will start from Wednesday)

तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे दहावीनंतर पदविका अभ्यासक्रम राबविण्यात येतो. यंदा दहावीचा निकाल अंतर्गत मुल्यमापनाच्या आधारे लागणार असून जुलैच्या अखेरपर्यंत निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. दरम्यान, तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे दहावीनंतरच्या तांत्रिक पदविका अभ्यासक्रमाच्या शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मधील प्रवेशासाठी इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांची माहिती संकलित करण्याची प्रक्रिया यापुर्वीच सुरू झाली आहे. यासाठी संचालनालयाने प्रवेशास इच्छुक विद्यार्थ्यांकडून माहिती जाणून घेण्यासाठी अर्ज संकेतस्थळावर उपलब्ध करून दिला होता. तसेच संचालनालयाच्या जिल्हा स्तरावरील अधिकाऱ्यांकडून प्रवेशाबाबत विद्यार्थ्यांचे समुपदेशन करण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

सविस्तर वेळापत्रक या वेबसाईटवर पाहता येणार

दहावीनंतरच्या पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला सुरवात होणार असल्याचे सामंत यांनी मंगळवारी सायंकाळी ट्विटरद्वारे जाहीर केले. या प्रवेश प्रक्रियेचे सविस्तर वेळापत्रक, प्रवेश प्रक्रियेचा तपशील, उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना तसेच अर्ज भरण्यासाठी http://www.dtemaharashtra.gov.in/ या संकेतस्थळाला भेट द्या, असे आवाहनही यावेळी सामंत यांनी केली. परंतु प्रत्यक्ष संकेतस्थळावर भेट दिली असताना मंगळवारी उशिरापर्यंत प्रवेश प्रक्रियेचा तपशील अपलोड झाले नसल्याचे दिसून आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : धैर्यशील माने-सत्यजित पाटील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये धुमश्चक्री

Video: दत्ता भरणे यांच्याकडून गावकऱ्यांना शिवीगाळ? सुप्रिया सुळे यांच्याकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार

Uber Fake Fare Scam : चालक दाखवतायत खोटं भाडं, ग्राहकांची होतेय लूट.. उबरने दिला सावधान राहण्याचा इशारा!

MI Playoffs Chances : बुडत्या मुंबईचं थालाच्या चेन्नईकडे लक्ष! MI फॅन्स निराश होऊ नका... अजूनही होता येईल क्वालिफाय?

Delhi Liquor Scam: मनीष सिसोदिया यांना दिलासा नाहीच, न्यायालयीन कोठडीत 15 मे पर्यंत वाढ

SCROLL FOR NEXT