Career Tips esakal
एज्युकेशन जॉब्स

Career Tips : कम्फर्ट झोनमधून बाहेर पडणे करिअरच्या ग्रोथसाठी आहे आवश्यक, जाणून घ्या 'या' टिप्स

कम्फर्ट झोनची सवय लागली तर, मग करिअरची गाडी पुढे कशी सरकणार?

Monika Lonkar –Kumbhar

Career Tips : अनेकदा कम्फर्ट झोन हा शब्द तुम्ही ऐकला असेल किंवा वाचला असेल. या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडा, किंवा कम्फर्ट झोनमधून बाहेर पडण्याचा आग्रह करताना ही अनेकांना पाहिले असेल. मात्र, त्यानंतर, सुद्धा अनेकांच्या मनात प्रश्न येतो की, हा कम्फर्ट झोन आहे तरी काय? आणि याचा करिअरमध्ये काय संबंध तर संबंध आहे मित्रांनो.

आपण जे करिअर निवडतो किंवा ज्या क्षेत्रात आपण काम करतो. तिथे आपण कम्फर्ट झोनमध्ये काम करतो किंवा कम्फर्ट झोनमध्ये काम करायला अनेक जण प्राधान्य देतात. मात्र, या कम्फर्ट झोनची सवय लागली तर मग करिअरची गाडी पुढे कशी सरकणार? हा देखील गहन प्रश्न आहे बरोबर ना?

मात्र, चांगल्या करिअरसाठी आणि करिअरमध्ये छान ग्रोथ करण्यासाठी हा कम्फर्ट झोन तोडून किंवा याच्या बाहेर पडून काहीतरी वेगळं करण्याची गरज आहे. जर हा कम्फर्ट झोन तुम्ही तोडलात तर याचा तुम्हाला करिअरमध्ये नक्कीच फायदा होईल. चला तर मग जाणून घेऊयात या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडण्यासाठी काही खास टिप्स.

कोणत्या गोष्टीची तुम्हाला भीती वाटते?

काहींना एकाच ठिकाणी जॉब करून तिथल्या वातावरणाची सवय झालेली असते. यालाच कम्फर्ट झोन ही म्हटले जाऊ शकते. मात्र, करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी तुम्हाला कधी ना कधी हा कम्फर्ट झोन तोडावा लागणार आहे.

एकाच ठिकाणी बरीच वर्षे काम केल्यामुळे अनेकांना असे वाटते की, दुसरीकडे जॉब मिळेल का? मी तिथे survive करू शकेल का? किंवा मला तिथले काम करायला जमेल का? असे अनेक प्रश्न त्यांच्या मनात येतात आणि त्यांना याची भीती देखील वाटते.

जर तुमच्या ही मनात अशा प्रकारची भीती असेल तर वेळीच ही भीती काढून टाका. तुम्ही त्यातून बाहेर पडू शकता. फक्त तुमचा स्वत:वर विश्वास असणे गरजेचे आहे.

तुमचे प्लॅनिंग योग्य दिशेने जात आहे ना ?

जर तुम्ही कम्फर्ट झोनमधून बाहेर पडायचा प्रयत्न करत असाल तर त्यासाठी योग्य प्लॅनिंग करणे महत्वाचे आहे. जर तुम्ही तुमचे करिअरचे क्षेत्र सोडून दुसऱ्या क्षेत्रात उतरण्याचा प्रयत्न करत असाल तर, एकदा तुमचे प्लॅनिंग योग्य दिशेने जात आहे ना? याची अवश्य खात्री करा.

अन्यथा प्लॅनिंग फसले तर नुकसान तुमचेच होणार आहे. यासाठी योग्य नियोजन करा आणि विचारपूर्वक निर्णय घ्या. कम्फर्ट झोनमधून बाहेर पडण्यापूर्वी किंवा पडताना तुमचा स्वत:वर पूर्ण विश्वास असणे आणि पुढील योग्य प्लॅनिंग असणे खूप गरजेचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ब्रिटनमध्ये तांत्रिक बिघाडामुळे एअर ट्राफिक, हजारो उड्डाणे रद्द; जगभरातील विमानसेवेला फटका, विमानतळांवर प्रवाशांची गर्दी

Premnagarcha Maharaja: मुंबईत आगमनसोहळ्यात मोठी दुर्घटना, तातडीने गणेशमूर्तीचं विसर्जन, नेमकं काय घडलं?

Marathi News Live Updates : मनोज जरांगे -पाटलांच्या उपोषणाचा आजचा बारावा दिवस, आतापर्यंत काय घडलं

Smart Meter Fire Uchgaon : उचगावमध्ये नवीन स्मार्ट मीटरने घेतला पेट; पहाटे घडलेल्या घटनेमुळे खळबळ, स्मार्ट मीटरच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह

मुख्यमंत्र्यांची मिमिक्री करणाऱ्याच्या मदतीने करायचा घोटाळे; भ्रष्टाचार, बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी बड्या अधिकाऱ्याला अटक

SCROLL FOR NEXT