मध्य रेल्वे sakal
एज्युकेशन जॉब्स

मध्य रेल्वेमध्ये लेव्हल 1 अन्‌ 2 पदांची भरती! आज शेवटची संधी

मध्य रेल्वेमध्ये लेव्हल 1 अन्‌ 2 पदांची भरती! आज शेवटची संधी

सकाळ वृत्तसेवा

उमेदवार आज, 20 डिसेंबर 2021 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करू शकतील.

सोलापूर : रेल्वे रिक्रूटमेंट सेल (Railway Recruitment Cell - RRC) मध्य रेल्वेने मुंबई (Mumbai), भुसावळ (Bhusaval), नागपूर (Nagpur), पुणे (Pune) आणि सोलापूर (Solapur) विभागांमध्ये लेव्हल 1 आणि लेव्हल 2 च्या पदांसाठी भरतीसाठी (Recruitment) जाहिरात प्रसिद्ध केली आहे. RRC CR ने दिलेल्या भरती जाहिरातीनुसार, 2021-22 च्या रिक्त पदांसाठी स्काउट्‌स आणि गाईड कोट्याअंतर्गत दोन्ही श्रेणीतील एकूण 12 पदांची भरती केली जाणार आहे. (Central Railway is recruiting for Level One and Two posts and today is the last chance)

असा करा अर्ज

पात्र उमेदवार सेंट्रल रेल्वे रिक्रूटमेंट सेलच्या अधिकृत वेबसाइट, rrccr.com वर उपलब्ध करून दिलेल्या ऑनलाइन फॉर्मद्वारे अर्ज करू शकतात. सोमवार, 6 डिसेंबर 2021 पासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून उमेदवार आज, 20 डिसेंबर 2021 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करू शकतील. अर्जादरम्यान, उमेदवारांना 500 रुपये शुल्क देखील भरावे लागेल, जे ऑनलाइनद्वारे भरले जाऊ शकते. तथापि, SC, ST, दिव्यांग, महिला आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत गटातील उमेदवारांसाठी, शुल्क फक्त 250 रुपये आहे.

शैक्षणिक पात्रता

लेव्हल 2 पदांसाठी, उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्डातून किमान 50 टक्के गुणांसह किंवा कोणत्याही समकक्ष पात्रतेसह बारावी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. त्याच वेळी, लेव्हल 1 पदांसाठी, उमेदवारांनी दहावी परीक्षा किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. लेव्हल 2 च्या पदांसाठी उमेदवारांचे वय 18 ते 30 वर्षे आणि लेव्हल 1 साठी 18 ते 33 वर्षांच्या दरम्यान असावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना सरकारी नियमांनुसार वयोमर्यादेत सवलत दिली जाईल. अधिक तपशिलांसाठी आणि इतर भरती संबंधित तपशिलांसाठी मध्य रेल्वे भरती अधिसूचना पाहा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BCCI statement on India vs Pakistan match: मोठी बातमी! भारत-पाकिस्तान मॅचबद्दल अखेर 'BCCI'ने स्पष्ट केली भूमिका

Sanjay Raut : आरक्षणावरून राज्यात अराजक; मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी

PM Modi AI video: पंतप्रधान मोदी अन् त्यांच्या आईंचा 'AI' व्हिडिओ प्रकरणी, आता काँग्रेस 'IT' सेलच्या नेत्यांविरुद्ध 'FIR' दाखल!

Umarga News : आरक्षण मिळावे या मागणीसाठी बंजारा समाजातील तरुणाने संपविले जीवन

Heavy Rain : शेलगाव (ज.) मध्ये ढगफुटी सदृश्य पावसाने धुमाकूळ; लोकांच्या घरात शिरले पाणी

SCROLL FOR NEXT