Online Admission Sakal
एज्युकेशन जॉब्स

अभियांत्रिकी पदविका प्रवेशांना मुदतवाढ

विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज करण्यासाठी तीन सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : दहावीनंतरच्या प्रथम वर्ष अभियांत्रिकी पदविका (engineering diploma admissions), तसेच बारावीनंतरच्या औषधनिर्माणशास्त्र, हॉटेल मॅनेजमेंट ॲण्ड केटरिंग टेक्नॉलॉजी, सरफेस कोटिंग टेक्नॉलॉजी प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेला पुन्हा एकदा मुदतवाढ मिळाली आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज करण्यासाठी तीन सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

शैक्षणिक वर्ष २०२१-२२ करिता पूर्णवेळ पोस्ट दहावी एसएससी आणि पोस्ट एचएससी या पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी तंत्रशिक्षण संचालनालयाकडून ही ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमासाठी राज्यात एकूण एक लाख तीन हजार जागा उपलब्ध आहेत. त्यासाठी आतापर्यंत ७८ हजार विद्यार्थ्यांनी अर्ज ऑनलाइन पद्धतीने निश्चित केला आहे. याबाबतचे परिपत्रक तंत्रशिक्षण संचालनालयाने

http://www.dtemaharashtra.gov.in’ या संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहे.

प्रवेशाचे सुधारित वेळापत्रक

दहावीनंतर

  • प्रवेशासाठी ऑनलाइन नोंदणी करणे, कागदपत्रांच्या स्कॅन छायाप्रती अपलोड करणे, कागदपत्रांची पडताळणी आणि अर्ज भरल्याची निश्चिती करणे : ३ सप्टेंबरपर्यंत

  • तात्पुरत्या गुणवत्ता याद्या प्रदर्शित करणे : ५ सप्टेंबर

  • तात्पुरत्या गुणवत्ता याद्यांमध्ये तक्रारी असल्यास सादर करणे : ६ ते ८ सप्टेंबर

  • अंतिम गुणवत्ता याद्या प्रदर्शित करणे : ९ सप्टेंबर

बारावीनंतर

  • प्रवेशासाठी ऑनलाइन नोंदणी करणे, कागदपत्रांच्या स्कॅन छायाप्रती अपलोड करणे, कागदपत्रांची पडताळणी आणि अर्ज भरल्याची निश्चिती करणे : ३ सप्टेंबरपर्यंत

  • तात्पुरत्या गुणवत्ता याद्या प्रदर्शित करणे : ५ सप्टेंबर

  • तात्पुरत्या गुणवत्ता याद्यांमध्ये तक्रारी असल्यास सादर करणे : ६ ते ७ सप्टेंबर

  • अंतिम गुणवत्ता याद्या प्रदर्शित करणे : ८ सप्टेंबर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Finance Manager Murder Case : ६ लाखांच्या कर्जासाठी फायनान्स मॅनेजरची हत्या; प्रेमी युगुलाचा धक्कादायक कट

Parent Care: खानगावमध्ये मातृ-पितृ सेवेला सलाम; दशक्रिया विधीत विजय बोंबले दांपत्याचा ‘उत्कृष्ट मातृ पितृ सेवा पुरस्कार’ देऊन गौरव

Duleep Trophy Final : इशान किशनचे दहावे शतक! मोहम्मद सिराजसह सर्व गोलंदाजांना चोप दिला, ४०० पारच्या दिशेने वाटचाल Video

Marathi News Live Updates : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात

नवरा असावा तर असा! 'स्वतः भांडी घासतात, किचनही साफ करतात'; पतीबद्दल बोलताना श्रेया घोषाल म्हणाली...'त्यांनी मला कधीच...'

SCROLL FOR NEXT