Footwear Designing Course esakal
एज्युकेशन जॉब्स

Footwear Designing Course : फूटवेअर डिझायनिंगमध्ये होऊ शकतं उत्तम करिअर; FDDI मध्ये प्रवेश प्रक्रियेला सुरूवात

फूटवेअर डिझाईन अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट इंन्स्टिट्यूटने आजपासून पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी रजिस्ट्रेशन सुरू केले आहे.

Monika Lonkar –Kumbhar

Footwear Designing Course : फूटवेअर इंडस्ट्रीचा विस्तार हा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. विदेशातील अनेक नावाजलेले फूटवेअर ब्रॅंड्स भारतात त्यांचे कारखाने सुरू करणार आहेत. या कंपन्यांमध्ये Nike, Adidas चा समावेश आहे. या कंपन्या भारतात मोठी गुंतवणूक करणार आहेत.

या माध्यमातून भारतीय तरूणांना रोजगार उपलब्ध होणार आहे. शूज, चप्पल्स, सॅंडेल्स इत्यादी अनेक प्रकार फूटवेअरमध्ये आहेत. मागील काही वर्षांमध्ये फूटवेअर इंडस्ट्रीचा विस्तार चांगलाच वाढत चालला आहे. त्यामुळे, फूटवेअर डिझायनिंग या क्षेत्रात आता करिअरच्या नव्या संधी निर्माण झाल्या आहेत.

जर तुम्हाला फूटवेअर डिझायनिंगची आवड असेल आणि या क्षेत्रात तुम्हाला करिअर करायचे असेल, तर या क्षेत्रात तुम्ही शिक्षण घेऊ शकता. हे शिक्षण घेऊन तुम्ही तुमचा पाया आणखी पक्का करू शकता. विशेष म्हणजे या क्षेत्रात पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम करता येतात.

या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी फूटवेअर डिझाईन अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट इंन्स्टिट्यूटने आजपासून (२५ ऑक्टोबर बुधवार) पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी रजिस्ट्रेशन लिंक सुरू केली आहे.

ज्या उमेदवारांना यासाठी अर्ज करायचा आहे, ते त्यांच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अर्ज करू शकतात. ही प्रवेश प्रक्रिया 2024-25 साठी पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी असणार आहे.

अर्ज कसा करायचा ?

या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी तुम्हाला अर्ज करावा लागेल. त्यासाठी, तुम्हाला फूटवेअर डिझाईन आणि विकास संस्थेच्या (फूटवेअर डिझाईन अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट इंन्स्टिट्यूट) अधिकृत वेबसाईटवर (fddiindia.com.) जावे लागेल. या वेबसाईटवर तुम्हाला या अभ्यासक्रमाबाबतची अधिकची माहिती मिळेल आणि तुम्हाला अर्ज ही करता येईल.

कोण करू शकतं अर्ज ?

फूटवेअर डिझायनिंगच्या या अभ्यासक्रमांना अर्ज करण्यासाठी उमेदवाराची कमाल वयोमर्यादा ही २५ वर्षे आहे. तसेच, या अभ्यासक्रमांना अर्ज करण्यासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्डातून 12 वी किंवा त्याच्या समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादेसाठी १ जुलै २०२४ पासून वयाची गणना करण्यात येईल. पदव्युत्तर अभ्यासक्रमाला प्रवेश करण्यासाठी उमेदवाराने पदवीमध्ये उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

शिवाय, या अभ्यासक्रमांना अर्ज करण्यासाठी उमेदवाराला 600 रूपयांचे शुल्क भरावे लागेल. तसेच, SC, ST, PWD प्रवर्गातील उमेदवारांना 300 रुपये शुल्क भरावे लागणार आहे.

या अभ्यासक्रमासाठी निवड कशी होणार ?

फूटवेअर डिझायनिंगच्या अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी तुम्हाला FDDI AIST 2024 ही प्रवेश परीक्षा द्यावी लागेल. या प्रवेश परीक्षेसाठीच ही नोंदणी सुरू करण्यात आली आहे. ही प्रवेश परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे.

या प्रवेश परीक्षेचा कालावधी हा २ तास ३० मिनिटे असणार आहे. या परीक्षेत एकूण १५० प्रश्न असतील. हे प्रश्न एकूण 200 गुणांचे असतील. या परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग केले जाणार नाही. ही निवड चाचणी फूटवेअर डिझाईन आणि विकास संस्थेद्वारे घेतली जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: 5/84 ते 5/385! हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांच्या १५० धावा; १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते इंग्लंडने केले

Saif Ali Khan : सैफ अली खानला मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने दिला मोठा धक्का!

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

SCROLL FOR NEXT