CS Exam  Sakal
एज्युकेशन जॉब्स

CS Exam Result: चिराग आणि आदित्य देशात प्रथम

शुक्रवारी दुपारी २०२१च्या सीएस परीक्षेचा निकाल घोषित करण्यात आला आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : कंपनी सचिव एग्जीक्यूटिव परीक्षेत नव्या अभ्यासक्रमानुसार चिराग अग्रवाल आणि जुन्या अभ्यासक्रमानुसार आदित्य जैनने देशात पहिला क्रमांक पटकाविला आहे. भारतीय कंपनी सचिव संस्थेच्या वतीने शुक्रवारी दुपारी २०२१च्या सीएस परीक्षेचा निकाल घोषित करण्यात आला आहे.

सीएस प्रोफेशन परीक्षेत नव्या अभ्यासक्रमानुसार श्रुती नागर आणि जुन्या अभ्यासक्रमानुसार आदित्य सोनी यांनी प्रथम येण्याचा मान मिळविला आहे. डिसेंबर २०२१मध्ये जुन्या आणि नव्या अभ्यासक्रमानुसार दोन टप्प्यात ही परीक्षा पार पडली होती. परीक्षेचा निकाल https://www.icsi.edu/ या संकेतस्थळावर घोषीत करण्यात आला आहे.

उमेदवारांना त्यांच्या नोंदणीकृत पत्त्यावर (जुना आणि नवीन अभ्यासक्रम) परीक्षेचा निकालाची प्रत प्राप्त होतील. जर एखाद्या उमेदवाराला निकाल जाहीर झाल्यापासून ३० दिवसांच्या आत निकालाची प्रत मिळाली नाही, त्याने संस्थेशी exam@icsi.edu येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

पुढील परीक्षेचे लवकरच अर्ज

डिसेंबर महिन्यातील सीएस परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर शनिवारी (ता.२६) आगामी परीक्षांसाठीची अर्ज प्रक्रीया सुरू होणार आहे, अशी माहिती आयसीएसआयच्या वतीने देण्यात आली आहे. सीएस कार्यकारी आणि प्रोफेशनल परीक्षा एक ते १० जून २०२२ या कालवधीत पार पडणार आहे.

जैन विद्यालयाचा कर्मचारी सीएस उत्तीर्ण

डेक्कन परीसरातील महावीर जैन विद्यालयातील कार्यालयात कार्यरत असलेले योगेश आप्रे सीएस परीक्षा उत्तीर्ण झाले आहे. नोकरी करत असतानाही काटेकोर अभ्यास करत आप्रे यांनी सीएस परीक्षा उत्तीर्ण झाले आहे. आप्रे म्हणाले,‘‘नोकरी करण्याच्या निमित्ताने मी अकलूजहून पुण्यात आलो होतो. तेव्हा जैन विद्यालयात काम करत असतानाच सीएसच्या परीक्षेबद्दल समजले. दिवसा नोकरी आणि रात्री अभ्यास असे करत २०१२ पासून मी तयारीला सुरवात केली.

संस्थेच्या सहकार्याने आणि घरच्यांच्या पाठिंब्याने मी ही परीक्षा उत्तीर्ण झालो आहे.’’ आयसीएसआयच्या १५ दिवसांच्या प्रशिक्षणानंतर आप्रे मेंबरशीपसाठी अर्ज करणार आहे. परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ते म्हणतात, ‘‘या परीक्षेसाठी प्रचंड एकाग्रतेची गरज आहे. समाज माध्यमे आणि इतर सर्व विचलीत करणाऱ्या घटकांपासून दूर राहीले पाहिजे. परीक्षेसाठी संयम खूप महत्त्वाचा असून, अपयश आल्यावरही तेवढ्यात ताकदीने स्वतःच्या चुका शोधून अभ्यास करायला शिकले पाहिजे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

SCROLL FOR NEXT