Satara Latest Marathi News Satara News 
एज्युकेशन जॉब्स

JEE MAIN परीक्षा देताय?, मग आधी 'ही' मार्गदर्शक तत्त्वे वाचा; म्हणजे, तुम्हाला सहज 'प्रवेश' मिळेल!

Balkrishna Madhale

सातारा : JEE Main 2021 : राष्ट्रीय चाचणी एजन्सीने (एनटीए) संयुक्त प्रवेश परीक्षेसाठी (JEE मुख्य परीक्षा) नुकतीच प्रवेश (हॉल तिकीट) पत्रके दिली असून ही परीक्षा 23 ते 26 फेब्रुवारी दरम्यान घेण्यात येणार आहे. या परीक्षेला आता थोडाच कालावधी शिल्लक राहिल्याने या परीक्षेला बसणार्‍या उमेदवार विद्यार्थ्यांनी मार्गदर्शक सूचनांचे काळजीपूर्वक पालन करणे, तितकेच महत्वाचे आहे. यासाठी एनटीएने सांगितले आहे की, कोविड-19 च्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून जेईई परीक्षा घेतली जाणार असून याचे विद्यार्थ्यांनी पालन करण्याचे आवाहनही त्यांच्याकडून करण्यात आले आहे.

महत्वाचे : परीक्षेच्या दिवशी उमेदवारांनी कोणते नियम पाळले पाहिजेत, ते आधी जाणून घ्या...

  • परीक्षेच्या दिवशी प्रवेश पत्रात लिहिलेल्या वेळेनुसार उमेदवारांने परीक्षा केंद्रावर पोहोचणे आवश्यक आहे.
  • गेट बंद झाल्यानंतर कोणत्याही उमेदवाराला प्रवेश घेता येणार नाही.
  • परीक्षा संपण्यापूर्वी कोणत्याही उमेदवाराला परीक्षा हॉल सोडण्याची परवानगी दिली जाणार नाही.
  • परीक्षा संपल्यानंतर पर्यवेक्षकांच्या सूचनांची प्रतीक्षा करा आणि सल्ला देईपर्यंत आपल्या जागेवरुन उठू नका. उमेदवारांना एकाच वेळी बाहेर जाऊ दिले जाईल. सर्व उमेदवारांना परीक्षेला जाण्यापूर्वी प्रवेश पत्रासोबत दिलेल्या कोव्हिडच्या सूचना काळजीपूर्वक डाऊनलोड करुन वाचाव्या लागतील. याद्वारे त्यांचे काटेकोरपणे पालन करावे लागेल.
  • उमेदवारांना परीक्षेच्या ठिकाणी एक दिवस अगोदर पडताळणी करण्याचा सल्ला देण्यात येतो, जेणेकरुन त्यांना परीक्षेच्या दिवशी कोणतीही अडचण येऊ नये.
  • उमेदवाराने कोणत्याही धर्म/चालीरितीमुळे कपडे परिधान केले असतील, तर प्रथम त्यांनी परीक्षा केंद्र गाठावे व संबंधितांकडून माहिती घेऊन सल्ला घ्यावा.
  • कोणत्याही उमेदवाराला प्रवेशपत्राशिवाय परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही.

- उमेदवारांना परीक्षेच्या ठिकाणी फक्त 'या' वस्तू बाळगण्याची परवानगी

  1. पारदर्शक पाण्याची बाटली
  2. वैयक्तिक सॅनिटाझर सोबत ठेवणे 
  3. साध्या पारदर्शक बॉल पेन
  4. एनटीए वेबसाइटवरून सेल्फ डिक्लरेशनची (अंडरटेकिंग) झेराॅक्स प्रत घेऊन परीक्षा केंद्रावर जाणे.
  5. उमेदवाराने उपस्थितीत जागेवर (पत्रकात) पासपोर्ट साइज आकाराचा फोटो चिटकावा.
  6. स्वत:चे ओळखपत्र (आयडी) सोबत असणे आवश्यक आहे.
  7. मास्क आणि हातमोजे (रुमाल) एकत्र असणे आवश्यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bullet Train Tunnel : समुद्राखालील बुलेट ट्रेन बोगद्याला वेग; दुसऱ्या टीबीएमने खोदकामाला सुरुवात

Rohit Sharma Retirement: 'सचिन-गावसकरही गेले, रोहितलाही जावं...' हिटमॅनच्या निवृत्तीच्या चर्चांवर कपिल देव यांचं विधान चर्चेत

Ahmedabad Fire: फटाक्यांच्या कारखान्यात भीषण आग; स्फोटांनी हादरला परिसर, ८ जणांचा मृत्यू, अनेक जखमी, कुठे घडली घटना?

Mumbai News: केईएमच्या कारभाराची मध्यरात्री पाहणी, डॉक्टरांची अनुपस्थिती; रुग्णांच्या उपचारात विलंब

Mumbai News: बदनामी करू नका, महेश ट्युटोरियलन्सने ३३ शाखा बंद करण्याचं सांगितलं कारण; मुंबईत ३० हजार क्लासेस सुरू

SCROLL FOR NEXT