Army Recruitment  google
एज्युकेशन जॉब्स

Army Recruitment : भारतीय सैन्यात पदवीधरांची भरती; २ लाखांपर्यंत मिळणार पगार

भारतीय सैन्य या भरती मोहिमेद्वारे १७५ पुरुष आणि १४ महिलांची भरती करणार आहे. सैन्याची ही भरती SSAC अंतर्गत केली जाणार आहे.

नमिता धुरी

मुंबई : भारतीय सैन्याने अभियांत्रिकी पदवीधर उमेदवारांकडून अधिकारी पदांच्या भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. यासाठी अभियांत्रिकी पदवी असलेले अविवाहित महिला आणि पुरुष या पदांसाठी अर्ज करू शकतात. या पदांसाठी ११ जानेवारी २०२३ पासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. (Army Recruitment) हेही वाचा - आर्थिक निर्णय घेताना बनू नका चिंतातूर जंतू....

इच्छुक उमेदवार भारतीय लष्कराच्या अधिकृत वेबसाइट joinindianarmy.nic.in वरून ९ फेब्रुवारी २०२३ पर्यंत अर्ज करू शकतात. भारतीय सैन्य या भरती मोहिमेद्वारे १७५ पुरुष आणि १४ महिलांची भरती करणार आहे. सैन्याची ही भरती SSAC अंतर्गत केली जाणार आहे.

शैक्षणिक पात्रता

या भारतीय सैन्य भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून संबंधित अभियांत्रिकी शाखेतील BE, B.Tech पदवी असणे आवश्यक आहे.

अभियांत्रिकी पदवीच्या अंतिम वर्षात शिकणारे विद्यार्थीही या पदांसाठी अर्ज करू शकतात. या सर्व उमेदवारांना १ ऑक्टोबर २०२३ पर्यंत त्यांचे उत्तीर्ण प्रमाणपत्र दाखवावे लागेल.

पगार

लेफ्टनंट पदावर निवड झालेल्या उमेदवारांना ५६,१०० रुपये ते १,७७,५०० रुपये पगार मिळेल. यासोबतच लष्करी सेवा वेतन १५,५०० रुपये असेल. निवड झालेल्या उमेदवारांना त्यांच्या प्रशिक्षणादरम्यान प्रति महिना ५६,१०० रुपये मानधन दिले जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

हिरा ठाकूर यांचा काँग्रेस प्रवेश, भाजपाला मोठा धक्का; राजकीय वर्तुळात खळबळ

MPSC Paper Leak : ‘पुरावा दिल्यास क्षणभरही पदावर राहणार नाही’; एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार

Ketan Agarwal Case : केतनचा बाहेरच्या व्यक्तीमार्फत खून घडवून आणण्याचा विचार; पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल यांची माहिती

Loha News : पत्नी प्रेमापोटी मूकबधिर तरुणाचे मोबाईल टॉवरवर शोले स्टाईल आंदोलन

Kevin Pietersen: वर्ल्ड कपआधी इंग्लंडचा मास्टरप्लॅन! १२ वर्षांनंतर पीटरसनला दिली संघात एन्ट्री; पण नेमकी भूमिका काय?

SCROLL FOR NEXT