ISRO Recruitment eSakal
एज्युकेशन जॉब्स

ISRO Recruitment : दहावी पास उमेदवारांना इस्रोमध्ये नोकरीची संधी, 60 हजारांहून अधिक पगार; वाचा सविस्तर

इस्रोच्या विक्रम साराभाई अंतराळ केंद्रावर मोठ्या प्रमाणात भरती निघाली आहे.

Sudesh

चांद्रयान-3, आदित्य अशा मोठ्या मोहिमांच्या यशामुळे इस्रोचं नाव जगभरात चमकलं आहे. यामुळेच भारताच्या अंतराळ संशोधन संस्थेमध्ये काम करण्यासाठी आता कित्येक तरुण-तरुणी इच्छुक आहेत. इस्रोच्या विक्रम साराभाई अंतराळ केंद्रावर मोठ्या प्रमाणात भरती निघाली आहे.

याठिकाणी हलके वाहन चालक-अ आणि अवजड वाहन चालक-ब या पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठी अर्ज प्रक्रिया 13 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. तर फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 27 नोव्हेंबर आहे.

सध्या याठिकाणी 18 पदे रिक्त आहेत. यातील 9 जागा हलके वाहन चालक आणि 9 जागा अवजड वाहन चालक या पदांसाठी आहेत. हलके वाहन चालक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे वैध एलव्हीडी लायसन्स असणं गरजेचं आहे. तसंच तीन वर्षे वाहन चालवण्याचा अनुभव देखील आवश्यक आहे.

अवजड वाहन चालक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदावाराकडे वैध एचव्हीडी लायसन्स असणं गरजेचं आहे. सोबतच, उमेदवाराकडे वैध सार्वजनिक सेवा परवाना असणं गरजेचं आहे. या दोन्ही पदांसाठी अर्ज करणारा उमेदवार दहावी/एसएसएलसी/एसएससी/मॅट्रिक उत्तीर्ण असणं गरजेचं आहे.

असा करा अर्ज

  • अर्ज करण्यासाठी सर्वात आधी ISRO VSSCच्या अधिकृत वेबसाईटवर जा.

  • त्यानंतर ISRO VSSC Recruitment 2023 या लिंकवर क्लिक करा.

  • याठिकाणी रजिस्ट्रेशन करा.

  • पुढे गेल्यानंतर अर्ज भरा आणि आवश्यक डॉक्युमेंट्स अपलोड करा.

  • अर्जाची फी भरा.

  • फॉर्म तपासून सबमिट बटणावर क्लिक करा. हा फॉर्म प्रिंट करून घ्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Award List: ऑरेंज-पर्पल कॅप आणि बक्कळ पैसा... पुरस्कार सोहळ्यातही वैभव सूर्यवंशीचाच डंका! पाहा विजेत्यांची संपूर्ण यादी

IPL 2026 Final: "जितेश राव, कसं वाटतंय?" हर्षा भोगलेंच्या प्रश्नावर RCB च्या Jitesh Sharma चं मराठीतून उत्तर; म्हणाला...

Virat Kohli Reaction : "आता मॅच जिंकवण्यासाठी मला एकट्यालाच मैदानात उतरावं लागत नाही!" विराट कोहली भावुक

Vaibhav Sooryavanshi : १५ वर्षाच्या पोराने मैदान गाजवले... Orange Cap सह ५ पुरस्कार जिंकल्यानंतर म्हणाला, या पर्वात शिकलो की...

IPL 2026: वैभव सूर्यवंशीला ५ पुरस्कार अन् पैशांचा पाऊस! १५ वर्षांच्या पोराला कारसह BCCI कडून किती रुपयांचे बक्षीस मिळाले?

SCROLL FOR NEXT