JNUEE 202 esakal
एज्युकेशन जॉब्स

'JNU' प्रवेश परीक्षेची तारीख जाहीर; 'या' दिवशी होणार परीक्षा!

बाळकृष्ण मधाळे

JNUEE 2021 : जवाहरलाल नेहरू प्रवेश परीक्षेसाठी (JNUEE 2021) नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली असून परीक्षा घेणाऱ्या नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) 27 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत JNUEE 2021 च्या परीक्षेसाठी अर्ज भरण्यास मान्यता दिलीय, तर अर्जाची फी 27 ऑगस्ट रोजी रात्री 11:50 पर्यंत भरण्यास सांगितलेय. (jnuee-2021-nta-commenced-the-registration-process-for-the-jnuee-2021-exam-will-be-held-in-september)

जवाहरलाल नेहरू प्रवेश परीक्षेसाठी (JNUEE 2021) नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

दरम्यान, जेएनयूईई परीक्षा 20 सप्टेंबरपासून सुरू होणार असून 23 सप्टेंबरपर्यंत ती घेतली जाणार आहे. या परीक्षेचा कालावधी 180 मिनिटांचा असेल, त्यामध्ये निवडक प्रश्न विचारले जातील. तसेच ही संगणक आधारित चाचणी असेल. या परीक्षेस बसणारे इच्छुक उमेदवार केवळ https://jnuexams.nta.ac.in ऑनलाइन अर्ज करू शकतात.

JNUEE 2021 : जवाहरलाल नेहरू प्रवेश परीक्षेसाठी नोंदणी कशी करावी?

सर्व प्रथम विद्यार्थ्यांनी नोंदणीकरिता अधिकृत वेबसाइटला https://jnuexams.nta.ac.in भेट द्यावी. त्यानंतर मुख्यपेजवरील 'जेएनयूईई - 2021 ऑनलाइन नोंदणी फॉर्म' या पर्यायावर क्लिक करावे. आपल्याला आता नवीन पेजवर निर्देशित केले जाईल, जिथे आपल्याला 'नवीन नोंदणी' पर्यायावर क्लिक करावे लागेल. ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर आपल्याला वैयक्तिक व पात्रतेचा संपूर्ण तपशील भरावा लागेल. यानंतर नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी परीक्षा शुल्क फीही भरावी लागेल. दरम्यान, या नोंदणी अर्जाबाबत कोणत्या अडचणी येत असतील, तर विद्यार्थ्यांनी 011-40759000 वरती कॉल करावा अथवा jnu@nta.ac.in वरती मेल करावा, असे सांगण्यात आले आहे.

jnuee-2021-nta-commenced-the-registration-process-for-the-jnuee-2021-exam-will-be-held-in-september

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Passed Away: अलविदा दादा ! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आज बारामतीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, राज्यात शोकाकूल वातावरण

Ajit Pawar Death: आभार मानायचे राहिले… पुण्यासाठी घेतलेला दादांचा तो निर्णय ठरला अखेरचा

Ajit Pawar Death News LIVE Updates : डोळ्यांत अश्रू, मनात शोक; अजितदादांना अखेरचा निरोप देण्यासाठी बारामतीत जनसागर, आज अंत्यसंस्कार

ED seizes Anil Ambani assets : अनिल अंबानींविरुद्ध ‘ED’ची मोठी कारवाई! १ हजार ८८५ कोटींच्या मालमत्ता तात्पुरती जप्त

Pune University Exam : मोठी बातमी! पुणे विद्यापीठाच्या गुरुवारी होणारी हिवाळी सत्र परीक्षा पुढे ढकलली

SCROLL FOR NEXT