ESIC Recruitment esakal
एज्युकेशन जॉब्स

'ESIC'मध्ये नोकरीची सुवर्ण संधी; परीक्षेशिवाय होणार थेट मुलाखत

कर्मचारी राज्य विमा निगम, मुंबई यांनी पार्ट टाइम मेडिकल रेफर पदांसाठी MBBS पूर्ण केलेल्या उमेदवारांची नेमणूक करण्याची अधिसूचना जारी केलीय.

सकाळ वृत्तसेवा

ESIC Recruitment 2021 : कर्मचारी राज्य विमा निगम (ESIC), मुंबई यांनी 08 पार्ट टाइम मेडिकल रेफर पदांसाठी MBBS पूर्ण केलेल्या उमेदवारांची नेमणूक करण्याची अधिसूचना नुकतीच जारी केलीय. पात्र उमेदवार ईएसआयसी मुंबईच्या 27 मे 2021 रोजी वॉक-इनमध्ये (मुलाखतीत) सहभागी होऊ शकतात. ज्या उमेदवारांना खालील पदांमध्ये रस आहे त्यांनी शैक्षणिक पात्रता, वेतन, वयोमर्यादा, अर्जाची फी, अर्जाची प्रक्रिया, वॉक-इन ठिकाणाचे तपशील आणि बरेच काही जाणून घेण्यासाठी वॉक-इनवर (मुलाखत) जाण्यापूर्वी संपूर्ण अधिसूचना वाचावी. (Job Opportunity In Employees State Insurance Corporation)

ही भरती मेडिकल रेफरीच्या पदांवर होणार असून या पदांवर अर्ज करणाऱ्या उमेदवारांना एमबीबीएसची मान्यता असावी. या पदांसाठी तेच उमेदवार अर्ज करु शकतात, ज्यांचे वय 27 मे 2021 रोजी 64 वर्षांपेक्षा जास्त नाही. ईएसआयसी मुंबईचा भाग होण्यासाठी इच्छुक उमेदवारांना नवीन ईएसआयसी मुंबई भरती 2021 साठी पार्टटाईम मेडिकल रेफरी पोस्टसाठी अर्ज करावा लागेल आणि 27 मे 2021 रोजी होणाऱ्या वॉक-इनमध्ये (मुलाखतीत) सहभागी व्हावे लागेल.

दरम्यान, शासकीय सेवेत असलेल्या पार्ट टाइम वैद्यकीय रेफरीसाठी दरमहा 3000 रुपये (निश्चित) दिले जातील. तसेच पार्ट टाइम वैद्यकीय रेफरी जे सरकारी सेवेत नाहीत. त्यांना महिन्याला 500 रुपये दर आठवड्याला एका सत्रासाठी दिले जातील. प्रत्येक आठवड्याच्या प्रत्येक अतिरिक्त सत्रासाठी दरमहा 250 रुपये दिले जातील. 15 सत्र किंवा त्याहून अधिक सत्रांसाठी एकूण (जास्तीत जास्त) दरमहा 20000 रुपये असेल. सत्र तीन तासांपेक्षा कमी नसावे.

रेल्वे रूग्णालयात नोकरीची सुवर्ण संधी; ऑनलाईन मुलाखतीव्दारे होणार 'मेडिकल स्टाफ'ची निवड

Job Opportunity In Employees State Insurance Corporation

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mallikarjun Kharge : पंतप्रधान मोदींच्या वडिलांबाबत खर्गेंचे वादग्रस्त विधान; भाजपची आज देशभरात निदर्शने

Aaditya Thackeray: हिंजवडीसाठी निधी मंजूर, तरीही कामे ठप्प; समस्यांबाबत आमदार आदित्य ठाकरे यांची राज्य सरकारवर टीका

Gokul Chairman Election Latest News : 'गोकुळ'चा अध्यक्ष आमचाच होणार! तांत्रिक मुद्द्यांवर महायुतीचे नेते अडथळा आणणार नाहीत; सतेज पाटील यांचा मोठा दावा

'एकही वर्ष गेलेलं नाही, ज्या वर्षी मी काम केलं नाही' सचिन पिळगांवकर नेहमी स्वतःचंच उदाहरण का देतात? स्वत: सांगितलं कारण, म्हणाले…

Ambabai Temple Donations : अंबाबाई चरणी 20 लाखांचे सोने, 44 लाखांची चांदी; नवरात्रोत्सवात भाविकांकडून भरभरून दान, 36 लाखांवर रक्कमही खजिन्यात

SCROLL FOR NEXT