Career Tips  esakal
एज्युकेशन जॉब्स

Career Tips : करिअर स्विच करतायं? मग ‘या’ गोष्टींची घ्या काळजी

करिअर स्विच करण्याचा विचार करत असाल, तर काही गोष्टी लक्षात ठेवा.

Monika Lonkar –Kumbhar

Career Tips : अनेकदा लोक करिअरमध्ये स्विच करतात. संबंधित फिल्ड सोडून दुसऱ्या फिल्डमध्ये अनेक जण जातात. मात्र, हा निर्णय घेण्यामागे प्रत्येकाची कारणे वेगवेगळी असू शकतात. हे निर्णय विविध परिस्थितींमध्ये घेतले जातात.

काही जण व्यावसायिक वाढीसाठी तर काही जण त्यांना आवड म्हणून ही दुसऱ्या क्षेत्रात जाण्याचा निर्णय घेतात. हा निर्णय घेणे सोपे नसते. शिवाय, करिअर स्विच करण्याचा निर्णय हा शांतपणे आणि विचार करून घेतला गेला पाहिजे. अन्यथा करिअरमध्ये अनेक समस्या निर्माण होण्याची शक्यता असते.

जर तुम्ही सुद्धा करिअर स्विच करण्याचा विचार करत असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवणे महत्वाचे आहे. तसेच, काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. करिअर स्विच करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी? त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

नीट विचार करा

एका संबंधित क्षेत्रातून दुसऱ्या क्षेत्राता जाताना आधी तुम्ही त्याबद्दल किती खात्रीशीर आहात? हे जाणून घेणे महत्वाचे आहे. त्यामुळे, तुमच्या मनाची यासाठी पूर्ण तयारी आहे का? हे तपासून पहा.

बरं ज्या क्षेत्रात उतरण्याचा तुम्ही विचार करत आहात त्यामध्ये करिअरचे कोणते पर्याय आहेत? याची नीट माहिती घ्या. शिवाय, त्या क्षेत्रामध्ये भविष्य किती सुरक्षित आहे? हे तपासून पहा. भविष्यात करिअर ग्रोथला काही स्कोप आहे का? या सर्व गोष्टींचा नीट विचार करा मगच पुढचे पाऊल टाका.

पुन्हा सुरूवात करावी लागणार

तुम्ही कोणत्याही क्षेत्रात जरी उतरला तरी सुद्धा तिथे तुम्हाला पुन्हा नव्याने सुरूवात करावी लागणार. यात काही शंका नाही. कारण, तुम्ही दुसऱ्या क्षेत्रात गेलात तर तुम्हाला लगेच जॉब मिळणार नाही.

त्यामुळे, पुन्हा बेसिक्सपासून सुरूवात करावी लागणार, हे तुम्हाला ही माहित असायला हवं आणि यासाठी तुम्ही तयार आहात का? हा प्रश्न ही स्वत:ला विचारून पहा.

नेटवर्क तयार करा

दुसऱ्या फिल्डमध्ये जाण्याचा तुमचा निर्णय पक्का झाला असेल किंवा तो निर्णय पक्का होण्यापूर्वी त्या दुसऱ्या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींशी संवाद साधण्याचा प्रयत्न करा.

तसेच, ज्या क्षेत्रात तुम्हाला स्विच करायचे आहे, त्या क्षेत्रात काम करणाऱ्या इतर व्यक्तींशी चर्चा करा. तुमचे नेटवर्क तयार करा. त्यांच्याशी चर्चा केल्यामुळे तुम्हाला आणखी माहिती मिळेल आणि योग्य तो निर्णय घेण्यास मदत होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: मोदींच्या आवाहनानंतर आठवड्याच्या सुरुवातीलाच सोनं स्वस्त! 10 ग्रॅम अन् 1 ग्रॅमसाठी आता किती रुपये मोजावे लागणार?

Aurangabad Hospital: आगीतून वाचवलेल्या जुळ्यांचा मृत्यू; एशियन हॉस्पिटलमधून दाखल केले होते 'घाटी' मध्ये, कुटुंबावर शोककळा

पुण्यात प्रसिद्ध हॉटेलमध्ये भाकरीत रबरबँड, ग्राहकानं शेअर केला VIDEO

आधी हात पकडला, नंतर कपडे काढत नको ते करण्याचा प्रयत्न, ओला चालकाचं महिलेसोबत गैरकृत्य; मध्यरात्री नवी मुंबईत काय घडलं?

Marathi News Live Updates : टीएमसी खासदार नदीमुल हक यांच्याशी संबंधित ७ ठिकाणांवर ईडीचे छापे

SCROLL FOR NEXT