एज्युकेशन जॉब्स

Rozgar Mela: दिवाळीत तरुणांना PM मोदी देणार मोठं गिफ्ट; 75,000 जणांना मिळणार जॉब

वर्षभरात १० लाख नोकऱ्यांचं आश्वासन मोदी सरकारनं दिलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील लाखो तरुणांसाठी रोजगार मेळाव्याचं आयोजन केलं आहे. या मेळाव्यांतर्गत दिवाळीत ७५,००० तरुणांना रोजगार उपलब्ध करुन दिला जाणार आहे. त्यामुळं तरुणांसाठी पंतप्रधानांनी दिलेलं हे दिवाळी गिफ्टचं असणार आहे. (PM Modi to launch Rozgar Mela 22 October 75000 to be appointed in first tranche)

पंतप्रधान कार्यालयाच्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे २२ ऑक्टोबर २०२२ रोजी तरुणांशी ऑनलाईन संवाद साधणार आहेत. यावेळी रोजगार मेळावा लॉन्च केला जाणार आहे. यामध्ये २०२३ पर्यंत १० लाख लोकांना रोजगार देण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे. यांपैकी पहिल्या टप्प्यात ७५,००० तरुणांना नोकऱ्या उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत.

दरम्यान, बेरोजगारीच्या मुद्यावरुन विरोधकांकडून कायम मोदी सरकारला निशाणा बनवण्यात येत आहे. त्यामुळेच सरकारनं रोजगार देणारी ही योजना आणण्याचा प्लॅन आखला. त्यानंतर सर्व विभाग आणि मंत्रालयांच्या समीक्षेनंतर यावर मिशन मोडवर काम सुरु करण्यात आलं होतं. त्याअंतर्गतच मोदी ७५,००० तरुणांना नोकरीचं नियुक्तीपत्र देणार आहेत.

विरोधकांचा आरोप

विरोधकांनी आरोप केला आहे की, मोदी सरकार तरुणांना रोजगार देण्यात अपयशी ठरलं आहे. गेल्या वर्षी केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी संसदेत सांगितलं होतं की, केंद्र सरकारच्या विभागांत १ मार्च २०२० पर्यंत ८.७२ लाख पदं रिक्त होती. केंद्रीय विभागांमध्ये एकूण ४० लाख ४ हजार पदं आहेत. ज्यामध्ये ३१ लाख ३२ हजार पद भरती झाली. सन २०१६-१७मध्ये सन २०२०-२१ दरम्यान एसएससीमध्ये एकूण २,१४,६०१ कर्मचाऱ्यांना भर्ती करण्यात आलं. तसेच आरआरबीमध्ये २,०४,९४५ जागांवर नियुक्त्या देण्यात आल्या होत्या तर युपीएससीत २५,२६७ उमेदवारांची निवड झाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrapur Accident: भाविकांचे वाहन उलटले, एक ठार, सतरा जखमी; भटाळा येथे गेले होते दर्शनासाठी

Latest Marathi News Update: काँग्रेस भवनात दगडफेक प्रकरणी १०० पेक्षा जास्त जणांवर गुन्हा

Pune News: रेल्वे चालकाला सात किलोमीटर आधीच दिसणार सिग्नल; प्रवाशांना सुरक्षेचे ‘कवच ४.०’, २५० किमीवर यशस्वी चाचणी!

Rohit Sharma चे खिलाडूवृत्तीचं ज्ञान पाजळणाऱ्या पाकिस्तानला कृतीतून उत्तर! IND vs PAK मॅचआधी वसीम अक्रमशी गळाभेट; Video Viral

Nagpur Crime : भाजप नगरसेविकेच्या पतीवर प्राणघातक हल्ला; गंभीर जखमी, संतप्त कार्यकर्त्यांची रुग्णालयासमोर गर्दी

SCROLL FOR NEXT