Exam  esakal
एज्युकेशन जॉब्स

Pune University : सत्र पूर्तता संपलेल्यांना शेवटची संधी; ३५ हजार विद्यार्थ्यांना होणार फायदा

सत्र पूर्तता संपलेल्या विद्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या वतीने दोन अतिरिक्त परीक्षांना बसण्याची शेवटची संधी देण्यात आली आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - सत्र पूर्तता संपलेल्या विद्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या वतीने दोन अतिरिक्त परीक्षांना बसण्याची शेवटची संधी देण्यात आली आहे. यामुळे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांतील ३५ हजारपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना थेट फायदा होणार आहे, अशी माहिती विद्यापीठाच्या परीक्षा व मुल्यमापन मंडळाच्या वतीने देण्यात आली आहे.

सत्र पूर्तता संपलेल्या विद्यार्थ्यांना एका शैक्षणिक वर्षासाठी परीक्षेस बसण्याची परवानगी देण्याबाबतचे पत्र विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागाने उपकुलसचिव मुंजाजी रासवे यांनी प्रसिद्ध केले आहे. परीक्षा मंडळाने सादर केलेल्या आणि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सुरेश गोसावी यांनी मान्यता दिलेल्या आराखड्यानुसार पात्र असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना अपवादात्मक स्थिती विचारात घेता, यापुढे दोन परीक्षांना बसण्याची शेवटची विशेष संधी देण्यास मान्यता देण्यात येत आहे, असे या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

विद्यापीठाशी संलग्न पुणे, नगर आणि नाशिक जिल्ह्यातील हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची भीती निर्माण झाली होती. परंतु, विद्यापीठ प्रशासनाने त्यावर मार्ग काढला आहे. अंतिम पूर्व व अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना दोन परीक्षा देण्याची संधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. २०१३-१४ पासूनच्या अंतिम पूर्व व अंतिम वर्षात अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दोन संधी मिळणार आहेत.

त्यामुळे पारंपरिक अभ्यासक्रमाच्या एस. वाय, टी वाय , च्या विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता येणार आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या शेवटच्या दोन वर्षाच्या विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता येईल, असे विद्यापीठाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे.

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. अंतिम पूर्व व अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना याचा विशेष फायदा होईल. काही कारणांमुळे परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी या शेवटच्या दोन संधीचा फायदा घ्यावा.

- डॉ. महेश काकडे, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT