Railway Recruitment esakal
एज्युकेशन जॉब्स

Railway Recruitment : बारावीनंतर रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ग्रुप 'क' आणि 'ड'साठी भरती सुरू; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

रेल्वेने नुकतेच गट क आणि ड च्या पदांच्या भरतीतीसाठी ऑनलाईन अर्ज मागवले आहेत.

Monika Lonkar –Kumbhar

Railway Recruitment : भारतीय रेल्वेमध्ये १२ वी नंतर नोकरी करण्याची सुवर्णसंधी निर्माण झाली आहे. जर तुम्हाला ही भारतीय रेल्वेमध्ये सरकारी नोकरी मिळवण्याची इच्छा असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. रेल्वेने नुकतीच गट क आणि ड च्या पदांच्या भरतीतीसाठी ऑनलाईन अर्ज मागवले आहेत.

रेल्वे भरती सेल (RRC) पश्चिम मध्य रेल्वे (WRC) ने एम्प्लॉयमेंट न्यूज (21-27 ऑक्टोबर 2023) मध्ये गट क आणि गट ड च्या पदांसाठी रेल्वेने ऑनलाईन अर्ज मागवले आहेत. ही भरती 2023-24 च्या वर्षासाठी केली जाणार आहे. शिवाय, पश्चिम मध्य रेल्वेमध्ये स्काऊट्स आणि गाईडच्या कोट्याअंतर्गत ही भरती केली जाणार आहे.

न्यूज 18 हिंदीने दिलेल्या वृत्तानुसार, या नोकरीसाठी आणि पदांसाठी इच्छुक असणारे उमेदवार 6 नोव्हेंबर 2023 रोजी किंवा त्यापूर्वी ऑनलाईन अर्ज करू शकतात. या भरतीच्या अधिसूचनेमध्ये दिलेल्या अतिरिक्त पात्रतेसह इयत्ता १० वी आणि १२ वी उत्तीर्ण झालेले उमेदवार जाहिरात क्रमांक 04/2023 च्या अंतर्गत पश्चिम मध्य रेल्वेमध्ये स्काऊट आणि गाईडच्या कोट्याअंतर्गत मोठ्या भरतीसाठी अर्ज करू शकतात.

रेल्वेमध्ये भरती करण्यात येणाऱ्या पदांची संख्या किती?

गट क (स्तर-२) : पदांची संख्या २

गट ड (स्तर-१) : पदांची संख्या ६

अर्जदाराची आवश्यक पात्रता खालीलप्रमाणे :

क गटासाठी आवश्यक पात्रता – इयत्ता १२ वी(+2 टप्पा) किंवा कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून त्याच्या समकक्ष परीक्षेत उमेदवाराला 50% पेक्षा कमी गुण नसावेत. तसेच, अनुसूचित जाती/जमाती/माजी सैनिक/ अपंग (पीडब्लूडी) उमेदवारांसाठी 50% गुणांची आवश्यकता नाही, किंवा ज्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा पदव्युत्तर पदवीधर इत्यादी.

या शिवाय, एखाद्या व्यक्तीची लिपीक सह टंकलेखक या श्रेणीमध्ये नियुक्ती केली असेल तर त्याची टायपिंगची क्षमता ३० शब्द प्रति मिनिट इतकी असणे आवश्यक आहे. तसेच, नियुक्तीच्या तारखेपासून ते दोन वर्षांच्या कालावधीमध्ये इंग्रजीत किंवा हिंदीमध्ये २५ शब्द प्रति मिनिट इतकी क्षमता असणे आवश्यक आहे आणि तोपर्यंत या श्रेणीतील त्या उमेदवाराची नियुक्ती ही तात्पुरती असेल.

ड गटासाठी आवश्यक पात्रता (स्तर१)

ड गटासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने १० वी उत्तीर्ण किंवा ITI किंवा कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड किंवा संस्थेकडून समकक्ष किंवा NCVT द्वारे प्रदान केलेले राष्ट्रीय शिकाऊ प्रमाणपत्र (NAC) असणे आवश्यक आहे.

निवड झालेल्या उमेदवारांना किती वेतन मिळणार ?

गट क (स्तर २) : स्तर-२ (७ वा सीपीसी) (पे मॅट्रिक्स रू.१९९००-६३२००)

गट ड (स्तर१) : स्तर-१ (७ वा सीपीसी) (पे मॅट्रिक्स रू. १८०००-५६९००)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel-LPG Rate: अहमदाबादमध्ये पेट्रोल 101 रुपयांवर, महाराष्ट्रात किती? पाहा पेट्रोल-डिझेल अन् LPG सिलेंडरचे ताजे दर

Marathi News Live Updates : एमपीएससीचे विद्यार्थी चर्चेला तयार- सुप्रिया सुळे

अचानक आवाज झाला अन् इमारत कोसळली, घटनेचा CCTV VIDEO समोर; ६ विद्यार्थ्यांचा मृत्यू, अजूनही बचावकार्य सुरू

Miami Airport Plane Crash : ॲमेझॉनचं विमान लँडिंग करताना धावपट्टीवरून घसरलं अ्न रस्त्यावर आलं, वाहनांना धडक; ५ जणांचा मृत्यू

पुन्हा पुन्हा तेच चेहरे पाहून कंटाळली तापसी पन्नू? बॉलीवूडच्या कास्टिंगवर तापसी पन्नूची टीका करत म्हणाली, 'रोमँटिक कॉमेडीत तेच...'

SCROLL FOR NEXT