Railway Recruitment esakal
एज्युकेशन जॉब्स

Railway Recruitment : कोकण रेल्वेमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी, 'या' पदांसाठी भरती सुरू, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही १० डिसेंबर २०२३ असणार आहे.

Monika Lonkar –Kumbhar

Railway Recruitment 2023 : रेल्वेमध्ये नोकरी करण्याचे जर तुमचे स्वप्न असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. कोकण रेल्वेमध्ये भरतीची प्रक्रिया नुकतीच सुरू झाली आहे. या संदर्भात कोकण रेल्वेने भरतीची अधिसूचना नुकतीच जारी केली आहे.

या भरतीनुसार कोकण रेल्वेमध्ये ट्रेनी अप्रेंटिस पदाच्या १९० जागांवर भरती केली जाणार आहे. या भरतीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी कोकण रेल्वेच्या अधिकृत वेबसाईटला konkanrailway.com भेट द्यावी आणि ऑनलाईन अर्ज भरावा.

भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही १० डिसेंबर २०२३ असणार आहे. या पदासाठी आवश्यक असणारी पात्रता कोणती? आणि यातून निवड कशी केली जाणार त्याबद्दल जाणून घेऊयात.

अशी केली जाणार उमेदवारांची निवड

कोकण रेल्वेने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे किमान १८ वर्षे आणि कमाल वय हे २५ वर्ष असे निश्चित करण्यात आले आहे. तसेच, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार कमाल वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.

शैक्षणिक पात्रता

शैक्षणिक पात्रतेबद्दल बोलायचे झाल्यास, अर्ज करणाऱ्या उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेमधून संबंधित क्षेत्रातील पदवी किंवा डिप्लोमा पूर्ण केलेला असावा.

या शैक्षणिक पात्रतेनुसार उमेदवाराची निवड केली जाईल. त्यानंतर, शॉर्टलिस्ट करण्यात आलेल्या उमेदवारांना कागदपत्रांच्या पडताळणी प्रक्रियेसाठी बोलावण्यात येईल. जे उमेदवार सर्व टप्पे पार करतील त्यांचा मेरिट लिस्टमध्ये समावेश केला जाईल. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Protest: ''दलितांना, शेतकऱ्यांना भडकावल्यानंतर आता विद्यार्थ्यांना चेतवलं जातंय'', दिल्ली आंदोलनावर योगी आदित्यनाथांचं वादग्रस्त विधान

Loni Kalbhor Police: लोणी काळभोर पोलिसांची एंजल हायस्कूलमध्ये व्यसनमुक्ती, सायबर सुरक्षा व महिला संरक्षणावरील जनजागृती कार्यशाळा

Career Numerology : 'या' 3 मुलांकाचे लोक वारंवार नोकरी बदलतात; पण याच निर्णयामुळे बनतं लाखोंचं करिअर

National Cycle Competition : मणीपूरचा अथोकपम बीके सिंग पुणे-बारामती राष्ट्रीय सायकल स्पर्धेचा यंदाचा विजेता....

Live Updates Marathi: नागपुरात सोनम वांगचुक आणि अभिजित दीपके यांचा समर्थनात तरुणाई एकत्र

SCROLL FOR NEXT