Jobs esakal
एज्युकेशन जॉब्स

'या' सहकारी बॅंकेत मॅनेजमेंट ट्रेनी पदांची भरती! पदवीधरांना संधी

'या' सहकारी बॅंकेत मॅनेजमेंट ट्रेनी पदांची भरती! पदवीधरांना संधी

सकाळ वृत्तसेवा

सहकारी बॅंकेत नोकरीच्या शोधात असलेल्या इच्छुकांसाठी नोकरीची संधी.

सोलापूर : सहकारी बॅंकेत नोकरीच्या (Jobs) शोधात असलेल्या इच्छुकांसाठी नोकरीची संधी. अभ्युदय सहकारी बॅंक लिमिटेडने (Abhyudaya Co-operative Bank Limited) मॅनेजमेंट ट्रेनी पदांच्या भरतीसाठी (Recruitment) जाहिरात प्रसिद्ध केली आहे. बॅंकेने जारी केलेल्या भरती जाहिरातीनुसार, व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी पदांसाठी 15 रिक्त जागा काढण्यात आल्या आहेत, ज्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. तथापि, जाहिरातीनुसार, रिक्त पदांच्या संख्येत सुधारणा केली जाऊ शकते. (Recruitment of Management Trainee Posts in Abhyudaya Co-operative Bank)

इच्छुक उमेदवार बॅंकेच्या अधिकृत वेबसाइट abhyudayabank.co.in वर उपलब्ध करून दिलेल्या ऑनलाइन फॉर्मद्वारे अर्ज करू शकतील. सोमवार, 20 डिसेंबर 2021 पासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून उमेदवार 3 जानेवारी 2022 पर्यंत अर्ज सादर करू शकतील. उमेदवारांना अर्ज सादर करताना 1000 रुपये शुल्क देखील भरावे लागेल, ते भरण्याची अंतिम तारीख देखील 3 जानेवारी आहे.

जाणून घ्या पात्रता व निकष

अभ्युदय सहकारी बॅंकेतील व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी पदांसाठी केवळ तेच उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत ज्यांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा इतर कोणत्याही उच्च शिक्षण संस्थेतून कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण केली आहे किंवा CA / CFA किंवा MBA / MMS / PGDBM पूर्ण वेळ मोडमध्ये केले आहे. तसेच, उमेदवारांचे वय 1 डिसेंबर 2021 रोजी 30 वर्षांपेक्षा जास्त नसावे, म्हणजेच उमेदवारांचा जन्म 1 डिसेंबर 1986 पूर्वी झालेला नसावा आणि 1 डिसेंबर 1991 नंतर झालेला नसावा. तथापि, सरकारी नियमांनुसार SC, ST, OBC आणि NT राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी उच्च वयोमर्यादा शिथिल आहे. अधिक तपशिलांसाठी भरती अधिसूचना पाहा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dalit CM : सिद्धरामय्यांचा उत्तराधिकारी कोण? कर्नाटकात दलित मुख्यमंत्रि‍पदाची चर्चा पुन्हा तापली, 'या' चार नेत्यांची नावे अग्रभागी

Nashik Women's Cricket World Cup Winner: झुंजार बहिणींचा विजय! महिला विश्वकरंडक जिंकताच नाशिकमध्ये मध्यरात्री 'दिवाळी', तिरंगा फडकावत जल्लोष

PM Narendra Modi: तेजस्वी यांच्या नावाला सहमती नव्हती; मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवारीवरून पंतप्रधान मोदी यांची काँग्रेसवर टीका

Latest Marathi News Live Update : महिला विश्वचषक विजयानंतर सांगलीत जल्लोष

आयोगाच्या बाजूने उत्तर देत नाही म्हणत भाजपनेही मतदारयादीतला घोळ पुराव्यासह दाखवला, 'सत्याचा मोर्चा'तलाच व्हिडीओ लावला

SCROLL FOR NEXT