EDU EXPO SAKAL
एज्युकेशन जॉब्स

सकाळ एज्यु एक्स्पो 2021 : आजचा व्याख्यानाचा विषय, वक्ते जाणून घ्या

सकाळ डिजिटल टीम

मेळाव्यातील ‘लाइव्ह वेबिनार’द्वारे विद्यार्थ्यांना विविध कोर्ससाठी सहभागी होता येईल. मेळाव्याद्वारे देशातील २५ नामवंत आणि अग्रगण्य अशा विद्यापीठांसमवेत जोडणे शक्य होणार आहे.

दहावी बारावी झालेल्या विद्यार्थ्यांना पुढे काय करायचं असा प्रश्न सतावत असतो. त्यांच्या मनात अनेक शंका असतात. करिअर संदर्भातील याच प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी आणि त्यांना दिशा दाखवण्यासाठी सकाळ एज्यु एक्स्पो 2021 चे आयोजन करण्यात आले आहे. याठिकाणी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जात असून प्रवेश प्रक्रिया, करिअरच्या वेगवेगळ्या संदी याची महिती दिली जाते. महाराष्ट्रातील सर्वात मोठा असा ऑनलाइन शैक्षणिक मार्गदर्शन मेळावा असून त्याची सुरुवात मंगळवारी 10 ऑगस्टपासून झाली. सकाळच्या या एज्यु एक्स्पोला पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांसह पालकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. एमआयटी विश्वशांती विद्यापीठ हे या ऑनलाइन मेळाव्याचे प्रमुख प्रायोजक आहेत.

११ ऑगस्ट २०२१ - वेळ : व्याख्यानाचा विषय : वक्ते

- सकाळी १० ते ११ : एमआयटी डब्ल्यूपीयुमधील व्यवस्थापन क्षेत्रातील करिअरच्या संधी : डॉ. टी जी विद्यासागर, एमआयटी वर्ल्ड पीस युनिर्व्हसिटी

- सकाळी ११ ते दुपारी १२ : बारावीनंतर कला, विज्ञान आणि वाणिज्य शाखेत विद्यार्थ्यांना उपलब्ध असणाऱ्या संधी : डॉ. पी. बी. माने, एआयएसएसएमएस

- दुपारी १२ ते १.३० : पॅरामेडिकल क्षेत्राची व्याप्ती आणि नोकरीच्या संधी : डॉ. निधी केवलरमाणी, टेक महेंद्रा स्मार्ट ॲकॅडमी फॉर हेल्थकेअर

- दुपारी २ ते ३ : वाणिज्य आणि व्यवस्थापन क्षेत्रातील करिअरच्या संधी : डॉ. पराग काळकर, अधिष्ठाता, वाणिज्य आणि व्यवस्थापन विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

- दुपारी ३ ते ४ : इम्पॉरंट ऑफ अपस्किलिंग इन युवर करंट रोल ॲण्ड हाऊ टू स्ट्राइक अ वर्क स्टडी बॅलन्स : डॉ. दिपक गुप्ता, एनएमआयएमएस ग्लोबल

- दुपारी ४ ते सायंकाळी ५ : कला क्षेत्रातील करिअरच्या संधी : प्रसाद वनारसे, थिएटर आर्टिस्ट व समीक्षक-

-सायंकाळी ५ ते ६ : अभियांत्रिकी क्षेत्रातील करिअरच्या संधी : डॉ. दिनेश भुतडा, एमआयटी वर्ल्ड पीस युनिर्व्हसिटी

मेळाव्यातील ‘लाइव्ह वेबिनार’द्वारे विद्यार्थ्यांना विविध कोर्ससाठी सहभागी होता येईल. मेळाव्याद्वारे देशातील २५ नामवंत आणि अग्रगण्य अशा विद्यापीठांसमवेत जोडणे शक्य होणार आहे. यामध्ये एमआयटी-एडीटीयू, एनएमआयएमएस, एआयएसएसएमएस, अमृता विश्व विद्यापीठम्‌, टेक महेंद्रा फाउंडेशन, कनव्हे डॉट इन आणि ॲमिटी युनिव्हर्सिटी मुंबई, ॲस्ट्युट ॲकॅडमी (फॉरेन लॅग्वेज टीचिंग ॲण्ड करिअर कौन्सिलर), शास्त्री ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स विंग्ज कॉलेज ऑफ एव्हिएशन टेक्नॉलॉजी या विद्यापीठ आणि नामांकित संस्थांचा समावेश आहे. शैक्षणिक प्रदर्शनासाठी ‘www.sakalexpo.com’ संकेतस्थळावर मोफत लॉगिन केल्यानंतर विद्यार्थी-पालकांना प्रदर्शनातील विविध स्टॉल्स, वेबिनार, हेल्प डेस्क येथे ऑनलाइनद्वारे भेट देणे अगदी सहज शक्य होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood Indian Missing : नेपाळमध्ये शेकडो भारतीय पर्यटक बेपत्ता, महाराष्ट्र सरकारकडून हेल्पलाइन सुरू, असा करा संपर्क

Gokul Election 2026 : 'गोकुळ'च्या सत्ताकारणाचा काउंटडाऊन सुरू! अंतिम मतदार यादीची तारीख ठरली; उमेदवारी अर्जाचा मुहूर्तही निश्चित, 410 संस्थांच्या हरकतीवर सुनावणी

Pune News: आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची झिरवळांकडून थट्टा? ‘खाऊन-पिऊन आंदोलन करा’ म्हणताच विद्यार्थ्यांनी सुनावलं

Hydrogen Train: जगातील सर्वांत शक्तिशाली हायड्रोजन रेल्वेचा नवा विक्रम; भारताच्या पहिल्या ट्रेनने ६ हजार किमी प्रवास पूर्ण

Marathi News Live Updates : कात्रज घाटात भाजपशी संबंधित निवडणूक साहित्याचा खच; स्वच्छता ग्रुपकडून कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT