Sandip Lagas Sakal
एज्युकेशन जॉब्स

बांधकाम मजुराचा मुलगा झाला पोलिस उपनिरीक्षक

संदीप लगस याचे प्राथमिक शिक्षण धायगुडेवाडी प्राथमिक शाळेत झाले असून माध्यमिक शिक्षण त्याने वरवंड येथील गोपीनाथ विद्यालयातून घेतले.

रमेश वत्रे

संदीप लगस याचे प्राथमिक शिक्षण धायगुडेवाडी प्राथमिक शाळेत झाले असून माध्यमिक शिक्षण त्याने वरवंड येथील गोपीनाथ विद्यालयातून घेतले.

केडगाव - चौफुला (ता. दौंड) बांधकाम मजुराचा (Construction Worker) मुलगा संदीप हनुमंत लगस (Sandip Lagas) हा पोलिस उपनिरीक्षक (PSI) झाला. राज्य लोकसेवा आयोगाने घेतलेल्या परीक्षेत तो १०० व्या स्थानावर आहे. या यशाबद्दल त्याचे कौतुक होत आहे.

चौफुल्यातील इंदिरानगरमध्ये तो राहतो. संदीप लगस याचे प्राथमिक शिक्षण धायगुडेवाडी प्राथमिक शाळेत झाले असून माध्यमिक शिक्षण त्याने वरवंड येथील गोपीनाथ विद्यालयातून घेतले. त्याने डीएडचे शिक्षण घेतले आहे. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून त्याने पदवी घेतली. २०१५ पासून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत आहे. पहिल्या तीन प्रयत्नात त्याला यश मिळाले नाही. मात्र त्याने जिद्द सोडली नाही. चौथ्या प्रयत्नात त्याला यश मिळाले. चौफुला येथून राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झालेले पहिले परिवहन अधिकारी स्व. तुकाराम धायगुडे हे संदीपचे प्रेरणास्थान आहेत. संदीपचे वडील बांधकाम मजूर असून ते सेंट्रींगची कामे करतात तर आई शेत मजूर आहे.

याबाबत संदीप लगस म्हणाला, गेली सात वर्ष माझ्या कुटुंबाने मला चांगली साथ दिली. तीन प्रयत्नात यश मिळाले नाही तरी त्यांनी मला प्रोत्साहन, आत्मविश्वास दिला. मी सुद्धा हार मानली नाही. या यशाने मी आई, वडील, बंधूंचे स्वप्न पुर्ण केले आहे. एक चांगले काम करून गावचा आणि कुटुंबाचा लौकीक वाढवायचा आहे. स्पर्धा परीक्षेचे चार टप्पे असतात. त्यात वेळ जातो. कुणी याचिका दाखल केली तर न्यायालयीन प्रक्रियेत वेळ जातो. त्यासाठी स्पर्धी परीक्षेचा अभ्यास करणा-या विद्यार्थ्यांनी संयम, चिकाटी, जिद्द, ठेवत अभ्यासावर लक्ष केंद्रीत केले पाहिजे.

परिवहन अधिकारी स्व. तुकाराम धायगुडे यांनी खंत व्यक्त केली होती की, 'चौफुल्यात माझ्यानंतर गेल्या २० वर्षात कोणीही आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाले नाही. माझ्या नंतर कोण ?' त्यानंतर मी माझा धाकटा भाऊ संदीपला याच मुद्यावर जोर देत त्याला प्रोत्साहित केले. त्याने पण जिद्द सोडली नाही. तो फौजदार झाल्याने आमचे स्वप्न पुर्ण झाले.

- सचिन लगस, संदीपचा भाऊ.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain: मुंबईत संततधार! चार धरणं ओव्हरफ्लो; सातही जलाशयांची आकडेवारी समोर

WTC Final 2027 Venue: जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची फायनल कुठे होणार? भारतीय संघ पात्र ठरू शकणार का? ICC ची घोषणा...

Latest Marathi Update : धुळे जिल्ह्यातील मुंबई आग्रा महामार्गावरील देवभाने फाट्यावर रास्ता रोको आंदोलन

Mumbai Crime: रेल्वेच्या वरिष्ठ अभियंत्याची २६ लाखांना फसवणूक, आरोपींमध्ये रेल्वे अधिकाऱ्याचा समावेश

Crime News: शाळेत १० रुपये चोरल्याचा आरोप; रागात शिक्षिकेकडून मारहाण, घरी येताच १० वर्षीय मुलीनं जीवन संपवलं

SCROLL FOR NEXT