State Bank Of India Jobs esakal
एज्युकेशन जॉब्स

Bank Jobs : बॅंकेत नोकरीची सुवर्णसंधी, SBI मध्ये 8,773 पदांवर भरती सुरू

स्टेट बॅंक ऑफ इंडियामध्ये तब्बल 8773 पदांवर भरती सुरू करण्यात आली आहे.

Monika Lonkar –Kumbhar

State Bank Of India Jobs : तरूणांसाठी बॅंकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी निर्माण झाली आहे. जर तुमचे बॅंकेत नोकरी करण्याचे स्वप्न असेल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. स्टेट बॅंक ऑफ इंडियामध्ये नुकत्याच तब्बल ८७७३ पदांसाठी भरती सुरू करण्यात आली आहे.

या संदर्भातली अधिसूचना नुकतीच जारी करण्यात आली असून ८७७३ क्लर्क पदांवर ही भरती केली जाणार आहे. या भरतीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाईटवर (sbi.co.in) जाऊन ऑनलाईन अर्ज भरावा.

अर्ज करण्याची प्रक्रिया

या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया १७ नोव्हेंबरपासून सुरू झाली असून तुम्ही ७ डिसेंबर २०२३ पर्यंत अर्ज करू शकता. अर्च करण्याची शेवटची तारीख ही ७ डिसेंबर आहे. त्यामुळे, इच्छुक उमेदवारांनी ७ डिसेंबरच्या आत ऑनलाईन अर्ज भरावा.

या ठिकाणांवर केली जाणार भरती

देशातील बंगळुरू, अहमदाबाद, भोपाल, अमरावती, भुवनेश्वर, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, चंडिगढ, दिल्ली, चेन्नई, हैदराबाद, केरळ, जयपूर, कोलकाता, लखनऊ, दिल्ली, मुंबई, पटना, तिरूअनंतपुरम इत्यादी शहरांमध्ये आणि काही राज्यांमध्ये या क्लर्क पदांची भरती केली जाणार आहे.

शैक्षणिक पात्रता

कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवार या क्लर्कच्या पदांसाठी अर्ज करू शकतात. या व्यतिरिक्त उमेदवाराचे वय हे २० ते २८ वर्षांदरम्यान असावे. OBC प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत ३ वर्षे आणि Sc/St प्रवर्गातील उमेदवारांना ५ वर्षांपर्यंतची सूट मिळेल.

उमेदवारांची अशी होणार निवड

क्लर्क पदांसाठी उमेदवारांची निवड ही प्रीलिम्स, मुख्य आणि स्थानिक भाषा परीक्षेच्या आधारे केली जाईल. यापैकी प्रीलिम परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने घेतली जाईल. ज्यामध्ये उमेदवाराला १ तासामध्ये १०० प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील. या १०० प्रश्नांमध्ये इंग्रजी भाषा, संख्यात्मक क्षमता आणि तर्कवितर्क या विषयांचा समावेश असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Award List: ऑरेंज-पर्पल कॅप आणि बक्कळ पैसा... पुरस्कार सोहळ्यातही वैभव सूर्यवंशीचाच डंका! पाहा विजेत्यांची संपूर्ण यादी

IPL 2026 Final: "जितेश राव, कसं वाटतंय?" हर्षा भोगलेंच्या प्रश्नावर RCB च्या Jitesh Sharma चं मराठीतून उत्तर; म्हणाला...

Virat Kohli Reaction : "आता मॅच जिंकवण्यासाठी मला एकट्यालाच मैदानात उतरावं लागत नाही!" विराट कोहली भावुक

Vaibhav Sooryavanshi : १५ वर्षाच्या पोराने मैदान गाजवले... Orange Cap सह ५ पुरस्कार जिंकल्यानंतर म्हणाला, या पर्वात शिकलो की...

IPL 2026: वैभव सूर्यवंशीला ५ पुरस्कार अन् पैशांचा पाऊस! १५ वर्षांच्या पोराला कारसह BCCI कडून किती रुपयांचे बक्षीस मिळाले?

SCROLL FOR NEXT