Book sakal
एज्युकेशन जॉब्स

पुस्तकाविनाच भरतेय शाळा, शिकवायचं कसं?

सकाळ वृत्तसेवा

अमरावती : पुस्तकांविना शाळा चालविण्याचा 'अभिनव उपक्रम' शिक्षण विभागाकडून जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. शिक्षकांकडून होणारी ओरड दुर्लक्षित करून विनापुस्तकी (student not get books) शाळा भरविण्यात येत आहे. शाळा सुरू होऊन अडीच महिने लोटूनसुद्धा पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना अद्यापही मोफत पुस्तके मिळालेली नाहीत, त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य टांगणीला लागलेले आहे.

कोरोनाची परिस्थिती आटोक्यात येताच शासनाच्या निर्देशानुसार 28 जूनपासून पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यात आल्या. पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना दरवर्षी मोफत पाठ्यपुस्तके दिली जातात. मात्र, यंदा ती पुरविण्यात आलेली नाही. त्यामुळे जुनी पुस्तके गोळा करून शिक्षकांच्या माध्यमातून ती दुसऱ्या वर्गातील विद्यार्थ्यांना देण्यात आली. नंतर पुन्हा शासन आदेशात बदल करण्यात आला. त्यानंतर सेतू अभ्याक्रमाचा घाट घालण्यात आला मात्र त्यालाही स्थगिती मिळाली, या दरम्यान शाळांकडून पुस्तकांची मागणी नोंदवून घेण्यात आली. गटशिक्षणाधिकाऱ्यांमार्फत शिक्षणाधिकारी कार्यालयाकडे संपूर्ण डेटा सोपविण्यात आला. मात्र, अडीच महिने उलटून सुद्धा एकाही विद्यार्थ्यांपर्यंत पुस्तके पोहोचली नाहीत, ही वास्तविकता आहे.

मागणीनुसार पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली आहेत, बालभारतीकडून काही पुस्तकांचा पुरवठा झाला नाही ही बाब खरी आहे, मात्र अपवादात्मक स्थितीत सर्वच शाळांना पुस्तके मिळालेली आहेत.
- ई. झेड. खान, शिक्षणाधिकारी, प्राथमिक, जिप.

पुस्तके गेली तरी कुठे? -

शाळांकडून नोंदविण्यात आलेली मागणीनुसार, पाठ्यपुस्तकांचे वितरण तालुकास्तरावर करण्यात आल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात येते, तर शिक्षक ते मानण्यास तयार नाहीत, अखेर पाठ्यपुस्तके गेली तरी कुठे? हा असा प्रश्न निर्माण झाला आहे.

आम्ही शिकविणार तरी कसे? -

पाठ्यपुस्तके अद्यापही प्राप्त झालेली नाहीत. विद्यार्थी नियमित शाळेत हजर राहताहेत. कसे तरी अ‍ॅडजस्टमेन्ट करून आम्ही मुलांना शिकवीत आहोत. एकाच पुस्तकावर दोन ते तीन विद्यार्थी शिकविणे सुरू आहे, असे एका शिक्षकाने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

College Student Death : वाढदिवसाच्या 3 दिवस आधीच काळाचा घाला! कोल्हापुरात 18 वर्षांच्या महाविद्यालयीन तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल; घरात कोणी नसताना संपवलं जीवन

Hingoli: हिंगोली जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचा सौम्य धक्का; वसईजवळ ३.५ तीव्रतेची नोंद, जीवित-वित्तहानी टळली..

Latest Marathi News Live Update : हिंगोलीत पुन्हा भूकंप, 3.5 रिश्टर्स स्केअर भूकंप झाल्याची भूमापक केंद्रावर नोंद

...अन् अचानक सेटवर आले रोहित शेट्टी! 'Governor' च्या शूटिंग दरम्यान चिन्मय मांडलेकरसोबत घडला रंजक प्रसंग

Maharashtra government : 'देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री तर चंद्रशेखर बावनकुळेंची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागणार?'; संजय राऊतांचा मोठा दावा

SCROLL FOR NEXT