Career Tips esakal
एज्युकेशन जॉब्स

Career Tips : स्वतःसाठी करिअरचे योग्य क्षेत्र कसे निवडायचे?

तुम्ही ठरवलेले ध्येय हे तुमच्या आवडीचे आहे ना? हे स्वत:ला विचारून बघा.

Monika Lonkar –Kumbhar

Career Tips : आपल्यातील अनेक जणांना १२ वी किंवा १० वी नंतर कोणत्या क्षेत्रात करिअर करावे? कोणते क्षेत्र निवडावे? याबद्दल मनात अनेक प्रश्न असतात. लहानपणी प्रत्येकाने एखादे स्वप्न पाहिलेले असते. जसे, की मला मोठेपणी डॉक्टर व्हायचे आहे, पायलट व्हायचे आहे.

मात्र, १० वी किंवा १२ वीत गेल्यावर पुन्हा एखाद्या वेगळ्या क्षेत्रात रूची निर्माण होते. असे अनेकांच्या बाबतीत होते. मग, अशा वेळी तरूणाईला प्रश्न पडतो की, स्वत:साठी योग्य करिअर कसे निवडावे? आज तुमच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न आम्ही या लेखातून करणार आहोत.

स्वत: बदद्ल जाणून घ्या

स्वत:बद्दल जाणून घेणे हे फार महत्वाचे आहे. अनेकदा काय होत की, आपल्याला नेमकं काय आवडत किंवा आपलं टॅलेंट नेमकं कशात आहे? हेच आपल्याला कळत नसत. अशा परिस्थितीमध्ये स्वत:चे आत्मपरिक्षण करा.

स्वत: मध्ये कोणती कौशल्ये आहेत ? ती जाणून घ्या. त्याचे मूल्यमापन करा. थोडक्यात तुमची ताकद कोणत्या क्षेत्रात आहे? हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा. मग तुम्हाला तुमच्या करिअरची निवड करायला सोपे जाईल.

करिअरचे योग्य प्लॅनिंग महत्वाचे

तुम्हाला ज्या क्षेत्रात करिअर करायचे आहे? त्याचे नीट प्लॅनिंग करा. हे प्लॅनिंग करणे फार महत्वाचे आहे. हे प्लॅनिंग एकदा केल्यानंतर, त्यावर चालण्याचा पुरेपूर प्रयत्न करा. तुमच्या ध्येयांची आखणी करा, ते हवं तर एका डायरीमध्ये लिहा आणि तुमच्यासाठी काय चांगले आहे? हे ओळखायला शिका.

तुम्ही ठरवलेले ध्येय हे तुमच्या आवडीचे आहे ना? हे स्वत:ला विचारून बघा आणि या ध्येयाचा पाठलाग करताना तुम्हाला आनंद मिळेल ना? हे देखील तपासून बघा.

मेहनत करा आणि पुढे जा

तुम्ही कोणतेही क्षेत्र जरी निवडले तरी त्यात मेहनत तुम्हाला करावीच लागणार आहे. मेहनत केली तरच तुम्हाला यश मिळणार आहे. हे अजिबात विसरू नका. तुम्हाला ज्या क्षेत्रात करिअर करायचे आहे.

ते करिअर तुम्ही तुमच्या आवडीने आणि नीट विचार करून निवडा. एकदा ते निवडले की त्यात झोकून देऊन काम करा. मग, बघा तुम्हाला यशस्वी होण्यापासून कुणीच अडवू शकणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sonam Wangchuk: 'या' अटी मान्य झाल्यास उपोषण सोडेन; रुग्णालयातून सोनम वांगचुक यांचे सरकारला पत्र, तोडगा निघणार?

Anna Hazare : लोकशाहीत जनतेचा आवाज दडपून नव्हे, तर संवादातून प्रश्न सोडवावेत; अण्णा हजारे यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र

Delhi Police: 'ते' साध्या वेशातील लोक खरंच पोलिस होते का? दिल्ली पोलिसांनी कर्मचाऱ्यांसाठी काढले कडक आदेश

New ODI & Test Captain: मोठा नेतृत्वबदल! १४१ आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा खेळाडू झाला कर्णधार, अफगाणिस्तानची घोषणा

Nalasopara ST Buses: आषाढी एकादशीपूर्वी नालासोपारा आगारात ५ नवीन एसटी बसेस; आमदार राजन नाईक यांच्या पाठपुराव्याला यश, वसई-विरार प्रवाशांना दिलासा

SCROLL FOR NEXT