एज्युकेशन जॉब्स

संधी करिअरच्या... : बारावीनंतर डिझायनिंग क्षेत्रात करिअर

गेल्या काही वर्षांपासून विद्यार्थ्यांचा ओढा काहीतरी नवीन ‘हटके’ विषयांमध्ये करिअर करण्याकडे आहे. डिझायनिंग हे असे एक क्षेत्र आहे.

विवेक वेलणकर

गेल्या काही वर्षांपासून विद्यार्थ्यांचा ओढा काहीतरी नवीन ‘हटके’ विषयांमध्ये करिअर करण्याकडे आहे. डिझायनिंग हे असे एक क्षेत्र आहे. डिझायनिंग म्हणजे रेखाटन वा चित्रकला , मॉडेल्स बनवणे, नवनवीन कल्पना काढणे असा सार्वत्रिक समज आहे, परंतु डिझायनिंग एवढ्यातच सिमित करता येणार नाही. कोणतीही वस्तू वा सेवा प्रणाली बनवताना ती तयार करण्यासाठी लागणारे साहित्य, बनवण्याची प्रक्रिया, हेतू किंवा कार्य हे निश्चितच महत्त्वाचे असतात, पण त्याचबरोबर वापरकर्त्याच्या शारीरिक क्षमता, भावनिक गरजा, सौंदर्य व आरामदायीपणाचे निकष, आजूबाजूचे संदर्भ व संस्कृती, शाश्वततेच्या गरजा या व अशा अनेक पैलूंचाही सखोल विचार करणे महत्त्वाचे ठरते.

ढोबळ मानाने पाहिले, तर वस्तू बनवताना दोन महत्त्वाच्या बाजूंचा विचार करायला हवा, एक म्हणजे तंत्रज्ञान (technology) आणि दुसरे म्हणजे अभिकल्पकी (design). यातील डिझाईनचे दोन भागांत विभाजन होते, एक म्हणजे सर्जनशीलता (creativity) व दुसरा म्हणजे विश्लेषणात्मक क्षमता (Analytical ability). डिझाईन म्हणजे या दोन्ही प्रकारच्या पैलूंचा सुयोग्य मेळ घालून वापरकर्त्याच्या समस्यांवर किंवा गरजांवर नवनवीन उपाय शोधण्याचे कार्यक्षेत्र. डिझायनिंग क्षेत्रात सगळ्यात महत्त्वाची आवश्यकता असते ती सर्जनशीलता अर्थात क्रिएटिव्हिटी. सर्जनशीलता ही अशी क्षमता आहे, ज्याद्वारे विद्यार्थी नावीन्यपूर्ण, विस्मयकारक व मूल्यवान कल्पना किंवा कलाकृतीची निर्मिती करू शकतो. डिझायनिंग क्षेत्रात करिअर करायचे असल्यास लागणारी क्षमता व कौशल्ये चार प्रकारची असतात.

१. हस्त कौशल्य व स्वानुभवातून कृती.

२. चिंतन, विश्लेषण व हटके विचार करण्याची क्षमता, त्रिमितीय विचार क्षमता, चिकित्सक विचारक्षमता, भावना व विचार व्यक्त करण्याची क्षमता.

३. नवनिर्मितीची दुर्दम्य इच्छा व अंत:प्रेरणा.

४. प्रयोगशीलता व परिश्रम करण्याची तयारी.

डिझायनिंग क्षेत्रातील उपशाखा

  • लाईफस्टाईल व फॅशन डिझायनिंग : वापरकर्त्याच्या राहणीमानाशी निगडीत गोष्टींचे (कपडे, पर्स, दागिने वगैरे) डिझाईन करणे.

  • यूजर एक्स्पिरियन्स डिझायनिंग : यामध्ये वापरकर्त्याच्या बदलत्या गरजा व तांत्रिक प्रगती यांचा मेळ घालून नवीन वेबसाईट, मोबाईल ऍप्लिकेशन , सोशल मीडिया प्लॅटफॉर्म डिझाईन करणे.

  • इंटेरिअर डिझायनिंग : यामध्ये वापरकर्त्याच्या घराची, ऑफिसची, हॉटेल, मॉल , सार्वजनिक जागांची अंतर्गत तसेच बाह्यरचना करणे.

  • मोबिलिटी व ट्रान्स्पोर्टेशन डिझायनिंग : सर्व प्रकारची वाहने व दळणवळणाची साधने यांचे डिझायनिंग करणे.

  • प्रॉडक्ट डिझायनिंग : सर्व प्रकारच्या वस्तूंचे नवनवीन डिझाईन/सुधारणा करणे.

  • ग्राफिक व कम्युनिकेशन डिझायनिंग : विविध प्रकारचे ब्रॅंडस्, लोगो, पॅकेजिंग, जाहिराती यांचे डिझायनिंग करणे.

  • फिल्म व ऍनिमेशन डिझायनिंग : चित्रपट, मालिका यांच्यामध्ये तंत्रज्ञानाचा वापर करून डिझायनिंग करणे. डिझायनिंग क्षेत्रात करिअर करण्यासाठी विविध राष्ट्रीय पातळीवरील संस्थांमध्ये प्रवेश परीक्षा देऊन शिक्षणाच्या उत्तम संधी उपलब्ध होतात, त्यासंबंधी पुढील भागात माहिती घेऊ यात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT