Health Field Sakal
एज्युकेशन जॉब्स

संधी करिअरच्या... : आरोग्य क्षेत्रातील कौशल्य विकास अभ्यासक्रम

कोरोना महामारीच्या संकटामुळे आपल्या देशातील आरोग्य क्षेत्रातील अपुरी गुंतवणूक, अपुरे मनुष्यबळ या गोष्टी प्रकर्षाने पुढे आल्या.

विवेक वेलणकर

कोरोना महामारीच्या संकटामुळे आपल्या देशातील आरोग्य क्षेत्रातील अपुरी गुंतवणूक, अपुरे मनुष्यबळ या गोष्टी प्रकर्षाने पुढे आल्या. कोरोनाचा, तसेच अन्य रोगांच्या साथींचा यापुढील काळातील वाढता धोका लक्षात घेऊन आरोग्य क्षेत्रात जास्तीत जास्त कुशल मनुष्यबळ निर्माण होणे आवश्यक आहे. यासाठी दहावी बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून प्रशिक्षण देऊन आरोग्यदूत म्हणून तयार करण्यासाठी कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज व ॲस्पायर नॉलेज व स्कील संस्था यांनी नॅशनल स्कील क्वालिटी फ्रेमवर्क यांच्या अंतर्गत काही अभ्यासक्रम सुरू केले आहेत. या अभ्यासक्रमांसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नसून विविध हॉस्पिटल्समध्ये ऑन द जॉब पद्धतीने हा चार महिन्यांचा कोर्स शिकवला जाणार आहे.

यात तीन महिन्यांच्या ॲप्रेंटिसशिप ट्रेनिंगचाही समावेश आहे. या ॲप्रेंटिसशिप ट्रेनिंग कालावधीत विद्यार्थ्यांना स्टायपेंडही दिला जाणार आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना विविध हॉस्पिटल्समध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. या कोर्सचा मुख्य उद्देश करोना योद्धे तयार करणे हा आहे. यामध्ये खालील अभ्यासक्रमांचा समावेश आहे.

१) बेसिक केअर सपोर्ट : रुग्णांची दैनंदिन शुश्रूषा, ड्रेसिंग यासाठी साहाय्य करणे , तसेच ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर, ऑक्सिजन सिलिंडर लावणे, रुग्णांच्या तब्येतीचे दैनंदिन रेकॉर्ड ठेवणे, औषधोपचार सांभाळणे या सर्व गोष्टींचे प्रशिक्षण दिले जाते.

२) होम केअर सपोर्ट : जे रुग्ण आजारी आहेत पण घरातच आहेत, त्यांना घरीच शुश्रुषा, ड्रेसिंग यांसाठी साहाय्य करणे, त्यांच्या दैनंदिन वापरातील वस्तू जंतुमुक्त करणे, त्यांच्या तब्येतीचे दैनंदिन रेकॉर्ड ठेवणे, औषधोपचार सांभाळणे या सर्व गोष्टींचे प्रशिक्षण दिले जाते.

३) ॲडव्हान्स केअर सपोर्ट : प्रशिक्षित नर्सेसच्या हाताखाली क्रिटिकल केअर युनिटमध्ये पेशंटची शुश्रुषा, औषधोपचार सांभाळणे, वेगवेगळ्या वैद्यकीय साधनांचा पेशंटसाठी वापर करणे, दैनंदिन रेकॉर्ड ठेवणे, सॅंपल्स घेणे या सर्व गोष्टींचे प्रशिक्षण दिले जाते.

४) सॅंपल कलेक्शन सपोर्ट : पेशंटचे नाक व घशातून सॅंपल घेणे , रॅपिड ॲटीजन टेस्ट करणे , लसीकरणादरम्यान मदत करणे , दैनंदिन रेकॉर्ड ठेवणे या सर्व गोष्टींचे प्रशिक्षण दिले जाते.

५) इमर्जन्सी केअर सपोर्ट : इमर्जन्सी वॉर्डमध्ये मदतनीस म्हणून काम करणे, प्रथमोपचार व शुश्रुषा, ड्रेसिंग करणे, रुग्णवाहिका आरोग्य सेवक म्हणून काम करणे , दैनंदिन रेकॉर्ड ठेवणे या सर्व गोष्टींचे प्रशिक्षण दिले जाते.

६) मेडिकल इक्विपमेंट सपोर्ट : व्हेंटिलेटर, ईसीजी, ऑक्सिजन सपोर्ट, बीपी/शुगर यंत्रे अशा विविध सहायक यंत्रांचे परिचालन करणे व दैनंदिन रेकॉर्ड ठेवणे या सर्व गोष्टींचे प्रशिक्षण दिले जाते.

आरोग्य क्षेत्रातील वाढत्या गरजा लक्षात घेऊन तयार करण्यात आलेल्या या वेतनासह प्रशिक्षण देणाऱ्या अभ्यासक्रमांसाठी खालील पत्त्यावर संपर्क साधावा :

ॲस्पायर नॉलेज ॲंड स्कील इंडिया, १२८९, जंगली महाराज रस्ता,

शिवाजीनगर , पुणे ४११००५.,

फोन ०२०-२५५३०२९१/ ९४२२६९६८३७

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT