PM Narendra Modi criticize Congress stealthy despite major attacks politics Esakal
Election News

Loksabha Election: लोकसभेला भाजप 400 हून अधिक जागा जिंकेल! भाजपच्या वरिष्ठ नेत्याचा मोठा दावा

छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थानातील विजयामुळं भाजपच्या गोटात सध्या प्रचंड उत्साहाचं वातावरण आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थानातील विजयामुळं भाजपच्या गोटात सध्या प्रचंड उत्साहाचं वातावरण आहे. यानंतर आता भाजप लोकसभा निवडणुकीच्या तयारीत व्यस्त झाली आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनालाही आजपासून सुरुवात झाली आहे. दरम्यान, भाजपचे वरिष्ठ नेते आणि खासदार निशिकांत दुबे यांनी मोठा दावा केला आहे. (BJP will win more than 400 seats in Lok Sabha big claim by a senior BJP leader Nishikat Dube)

भाजपाबाबत केला मोठा दावा

निशिकांत दुबे म्हणाले, "२०२४च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला ४०० हून अधिक जागा मिळेल" दरम्यान, पंतप्रधान मोदी संसदेत आल्यानंतर भाजपच्या खासदारांनी त्यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करायला सुरुवात केली. काही खासदारांनी तर वारंवार मोदी सरकारच्या नावानं घोषणाबाजी केली अन् मोदी मोदीच्या घोषणाही दिल्या. (Marathi Tajya Batmya)

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या सुरुवातीला नरेंद्र मोदी यांनी मीडियाशी बोलताना विरोधकांना एक सल्लाही दिला. पंतप्रधान म्हणाले, विरोधकांनी देशात सकारात्मकता पसरवायला हवी केवळ विरोधाला विरोध करु नये. (Latest Marathi News)

विधानसभा निवडणुकीत पराभवाची चीड व्यक्त करण्यासाठी योजना बनवण्याऐजी विरोधकांना ९ वर्षांची नकारात्मक वृत्ती सोडावी. तसेच मोदी सर्व खासदारांना म्हणाले, लोकशाहीचं मंदिर जनआकांक्षांसाठी आणि मजबूत भारताचा पाया अधिक मजबूत करण्यासाठी खास मंच आहे.

महुआ मोईत्रावर हल्लाबोल

निशिकांत दुबे यांनी तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रांवरही हल्लाबोल केला. पत्रकारांनी त्याला विचारलं की, महुआ मोईत्रा यांचं सदस्यत्व राहिल की जाईल? याचं उत्तर देताना त्यांनी म्हटलं की, महुआ मोईत्रा यांच्यावर १२ वाजल्यानंतर रिपोर्ट सादर केला जाईल. यावर विरोधीपक्ष नेते अधीर रंजन चौधरी यांनी म्हटलं की, अहवाल लीक करण्यात आला आहे. यावर दुबेंनी पलटवार करताना. असं वाटतंय की अधीर रंजन यांनीच हा अहवाल लीक केल्याचं म्हटलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Update: महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत मंगळवारपासून २९ ऑगस्टपर्यंत मध्यम स्वरूपाचा पाऊस, काय आहे हवामान खात्याचा अंदाज

Latest Marathi News Updates : तुळजापुरात बनावट लिंक पाठवून पिता-पुत्रांची १६ लाखांची फसवणूक

Annual Toll Pass:'टोलच्‍या वार्षिक पासवर पसंतीची मोहर'; देशात आठच दिवसांत पाच लाखांहून अधिक जणांकडे सुविधा, शासनाला मिळाला १५० कोटींचा महसूल

Ghati Medical College: ‘घाटी’तील ३५७ पदांसाठी अकरा शहरांत आजपासून परीक्षा; ‘टीसीएस’तर्फे २७ केंद्रांवर तीन सत्रांमध्ये नियोजन

Accident News : भरधाव कंटेनरची भाविकांच्या ट्रॅक्टरला धडक, ८ जणांचा जागीच मत्यू, ४३ जखमी

SCROLL FOR NEXT