Amit Shah and Eknath Shinde during their meeting discussing seat-sharing and election strategies for the Maharashtra Assembly elections. esakal
Maharashtra Election 2025 Result

Amit Shah: शाह-शिंदे भेटीची इनसाईड स्टोरी, बैठकीत काय घडलं? मुख्यमंत्र्यांनी काय दिला शब्द!

Chief Minister Eknath Shinde's Request and Amit Shah's Assurances on Seat Sharing: अमित शाह यांनी एकनाथ शिंदेंना जागावाटपाच्या बाबतीत सर्व समन्वय साधून निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. सर्व पक्षांच्या नेतृत्वाच्या सहमतीने योग्य वेळी जागावाटप जाहीर केले जाईल, अशी शाह यांची ग्वाही होती. त्यांनी यावेळी महायुतीमध्ये एकता राखण्याचे महत्त्व अधोरेखित केले.

Sandip Kapde

मुंबई: विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्याने महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. काल रात्री उशीरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी महायुतीच्या नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत भारतीय जनता पक्ष (भाजप), शिवसेना, आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी हजेरी लावली होती. या बैठकीत काय घडलं याबद्दल महत्त्वपूर्ण माहिती सुत्रांनी दिली आहे.

जागावाटपावर चर्चा, मुख्यमंत्री शिंदेंची महत्त्वाची मागणी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठकीदरम्यान अमित शाह यांच्याशी महायुतीच्या जागावाटपाबाबत महत्त्वाची चर्चा केली. लोकसभा निवडणुकांप्रमाणे जागावाटप करण्यास आणि उमेदवारांची नावे जाहीर करण्यास विलंब नको, अशी मुख्यमंत्र्यांनी शाह यांना विनंती केली. त्यांनी जागावाटपावर लवकर निर्णय घ्यावा आणि ही प्रक्रिया शक्य तितक्या लवकर पूर्ण व्हावी अशी मागणी केली. शिंदेंनी त्यांना अपेक्षित असलेल्या जागांबद्दल सविस्तर माहिती दिली आणि त्या जागा का हवे आहेत याचे स्पष्टीकरणही दिले.

‘लाडकी बहीण योजना’चा उल्लेख-

राज्य सरकारकडून राबवण्यात आलेल्या योजनांचा लाभ लोकांपर्यंत पोहोचल्याचा दाखला देत शिंदेंनी "लाडकी बहीण" योजनेचा विशेष उल्लेख केला. या योजनेसारख्या कल्याणकारी योजनांना प्राधान्य देण्याचे आणि त्यांच्यावर अधिक लक्ष केंद्रित करण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. अमित शाह यांना या योजनांची माहिती देत, आगामी निवडणुकांमध्ये या योजना कशा प्रभावी ठरू शकतात यावर चर्चा करण्यात आली.

महायुतीमधील मतभेदावर शाह यांचा सल्ला-

महायुतीच्या बैठकीत अमित शाह यांनी सर्व नेत्यांना एकत्र राहण्याचे आणि एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जाण्याचे महत्त्व पटवून दिले. "महायुतीमध्ये विसंवाद आहे" असे लोकांपुढे चित्र निर्माण होऊ नये, असे सांगत, सर्वांनी आपापसातील मतभेद विसरून एकत्र लढावे, असा शाह यांनी सल्ला दिला. त्यांनी महायुतीला एक कुटुंब मानून काम करावे, असेही नमूद केले.

शाह यांची शिंदेंना ग्वाही-

अमित शाह यांनी एकनाथ शिंदेंना जागावाटपाच्या बाबतीत सर्व समन्वय साधून निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. सर्व पक्षांच्या नेतृत्वाच्या सहमतीने योग्य वेळी जागावाटप जाहीर केले जाईल, अशी शाह यांची ग्वाही होती. त्यांनी यावेळी महायुतीमध्ये एकता राखण्याचे महत्त्व अधोरेखित केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT