Election News

Rajasthan Election : वाद मिटला? पंतप्रधानांनी सचिन पायलट यांचं कौतुक केल्यानंतर गेहलोत यांनी पोस्ट केला एक व्हिडीओ

सकाळ वृत्तसेवा

जयपूर: राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी शुक्रवारी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवरुन एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये सचिन पायलट हे काँग्रेसच्या उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन करताना दिसत आहेत.

गेहलोत आणि माजी मुख्यमंत्री पायलट यांच्यातील संघर्ष संपला असून दोघांमध्ये समेट झाला असल्याचा संदेश देण्यासाठीच हा व्हिडिओ शेअर केला असल्याचे मत राजकीय विश्‍लेषकांकडून व्यक्त केले जात आहे.

गेहलोत यांनी फेसबुक, इंस्टाग्राम आणि एक्सवर, पायलट यांचा सुमारे पावणे दोन मिनिटांचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ सध्या राजस्थानातील राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.

पायलट यांचे आवाहन

गेहलोत यांनी पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये, पायलट यांनी राजस्थानातील नागरिकांना पुन्हा एकदा राज्यात काँग्रेसचे सरकार निवडून देण्याचे आवाहन केले आहे.‘‘आम्ही या निवडणुकीच्या निमित्ताने राज्यातील विविध ठिकाणी शेकडो सभा घेतल्या आहेत. मात्र तरी देखील काही भागात आम्ही पोहोचू शकलो नाही.

त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्या सर्वांना विनंती करतो की, राज्याच्या विकासाची गती कायम ठेवण्यासाठी आणि राज्याच्या प्रगतीसाठी काँग्रेसला मतदान करावे. राजस्थानमध्ये भाजपची सत्ता आल्यास काँग्रेस सरकारच्या काळात सुरू करण्यात आलेल्या योजना बंद करण्याचा भाजपचा डाव असून आपण त्यांचे हे मनसुबे हाणून पाडू या’’ असे आवाहन पायलट यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून केले आहे.

काय म्हणाले होते पंतप्रधान मोदी?

गांधी कुटुंबावर निशाणा साधताना पीएम मोदींनी राजेश पायलट आणि सचिन पायलट यांच्यावर काँग्रेसने अन्याय केल्याचा ठपका ठेवला आहेत. त्यांनी सलग दुसऱ्या दिवशी यासंदर्भात भाष्य केलं. ते म्हणाले की, मी काँग्रेसच्या शाही परिवारावर काही प्रश्न उपस्थित केले होते. त्यामुळे तीर निशाण्यावर लागला आणि अर्ध्या तासात संपूर्ण काँग्रेस हादरली.

कानाकोपऱ्यातून काँग्रेसवाले चावचाव करत बाहेर पडले. त्यांना माहितंय, मोदींनी अशी गोळी चालवलीय, की काँग्रेसचं जगणं अवघड होऊन जाईल. राजेश पायलट यांच्याविषयी काँग्रेस विधानं करीत आहे आणि पत्रकार परिषदा घेत आहे. काँग्रेस पूर्ण ताकदीने खोटं बोलत आहे की, काँग्रेसने कधीच पायलट यांचा अपमान केला नाही. परंतु खऱ्या प्रश्नांची उत्तरं ते देत नाहीयेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना मोठा धक्का ! ९२ लाख महिलांची नावे वगळली; 'ही' मोठी कारणे आली समोर

Mumbai News: एकुलती एक मुलगी, १६ वर्षे कोमात, ३७ लाख भरपाई देण्याचे आदेश; वेदनांची भरपाई पैशात होणार नाही !

Adani समूह आता स्मार्ट मीटर कंपनी विकत घेण्याच्या तयारीत; 1500 कोटींची डील होण्याची शक्यता...

Latest Marathi News Live Update : तामिळनाडूमध्ये गोवंश हत्याबंदी लागू करण्याच्या मद्रास उच्च न्यायालयाच्या निर्देशाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती

Pune News: दूषित पाण्यामुळे आरोग्याशी खेळ! कात्रजमध्ये पाणीपुरवठा विभागाचा गोंधळ; जलवाहिनीच्या गळतीमुळे पाणीटंचाई आणि दूषित पाणी

SCROLL FOR NEXT