Election News

Kamareddy Result : मावळत्या अन् भावी दोन्ही मुख्यमंत्र्यांना दिली धोबीपछाड! कोण आहे हा भाजपचा 'बाहुबली' उमेदवार?

Katipally Venkatraman Reddy : 12 वी पास असणाऱ्या वेंकट रमण रेड्डी यांच्याकडे सुमारे 50 कोटींची संपत्ती आहे. यासोबतच, त्यांच्यावर 11 केसेस देखील दाखल आहेत.

Sudesh

Telangana Kamareddy Constituency Result : एकीकडे तेलंगणामध्ये काँग्रेसच्या विजयाची चर्चा सुरू असतानाच, भावी मुख्यमंत्री पदाचे प्रबळ दावेदार असणाऱ्या रेवंत रेड्डी यांना पराभव स्वीकारावा लागला आहे. कामारेड्डी मतदारसंघातून भाजपच्या कटिपल्ली वेंकट रमण रेड्डी यांनी त्यांचा दारुण पराभव केला आहे. विशेष म्हणजे, याच ठिकाणी तेलंगणाचे सध्याचे मुख्यमंत्री केसीआर देखील उभे होते. त्यांनाही रेड्डी यांनी धोबीपछाड दिली आहे.

वेंकटरमण रेड्डी यांना एकूण 66,652 मतं मिळाली. दुसऱ्या क्रमांकावर केसीआर यांना 59,911 मतांवर समाधान मानावं लागलं. तर 54,916 मतांसह काँग्रेसचे रेवंत रेड्डी हे तिसऱ्या क्रमांकावर राहिले. निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर याबाबतची माहिती देण्यात आली.

नॉर्थ तेलंगणामध्ये असलेल्या कामारेड्डी मतदारसंघाकडे सर्वांचंच लक्ष लागलं होतं. मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव आणि काँग्रेसचे रेवंत रेड्डी या दोघांनी कामारेड्डीमधून अर्ज दाखल केला होता. त्यामुळे याठिकाणी होणारी लढत चुरशीची ठरणार हे नक्की होतं. त्यातच भाजपच्या उमेदवारामुळे ही रंगत आणखी वाढली.

भाजपने याठिकाणी उद्योगपती असणाऱ्या कटिपल्ली वेंकट रमण रेड्डी यांना उभं करण्याचा निर्णय घेतला. वेंकट रमण रेड्डी हे पूर्वी भाजपचे कामारेड्डी विधानसभा इंचार्ज राहिले आहेत. सोबतच ते निझामाबाद जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देखील होते. 12 वी पास असणाऱ्या वेंकट रमण रेड्डी यांच्याकडे सुमारे 50 कोटींची संपत्ती आहे. यासोबतच, त्यांच्यावर 11 केसेस देखील दाखल आहेत. मग अशा उमेदवाराने दोन दिग्गजांना कसं हरवलं?

कामारेड्डी विधानसभा मतदारसंघ हा पुरेसा साक्षर म्हणता येईल असा नाही. याठिकाणचा साक्षरता दर हा 49 टक्के एवढा आहे. वेंकट रमण रेड्डी यांचं हे होमग्राउंड आहे. याठिकाणी त्यांनी अधिकार पदावर नसतानाही स्वतःच्या पैशांनी रुग्णालये, शाळा आणि मंदिर उभारले आहेत. यामुळेच त्यांना स्थानिक नागरिकांचा भरपूर पाठिंबा आहे.

नागरिकांनी शोधला तिसरा पर्याय

2014 साली झालेल्या निवडणुकांमध्ये कामारेड्डी मतदारसंघातून काँग्रेसचा उमेदवार निवडून आला होता. त्यानंतर 2018 साली ही जागा बीआरएसच्या खात्यात गेली. यावर्षी लोकांनी या दोन्ही पक्षांना डच्चू देत, तिसरा पर्याय निवडण्याचा निर्णय घेतला असावा. याचाच फायदा भाजपला झाला असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IMD Weather Alert : चक्रीवादळाने रौद्ररूप धरले! ताशी १०० किमी वेगाने सुटणार सोसाट्याचा वारा; 'या' राज्यांत मुसळधार पाऊस, महाराष्ट्रात काय घडणार?

फ्लिपकार्टच्या गोदामातून ९८० सॅमसंग मोबाईल चोरीला; पुरावा मिळू नये म्हणून CCTV चा डीव्हीआरही पळवला...

Jamgaon News: रविवारी सुट्टी असतानाही सीईओंची जामगावला भेट; अपघातात मृत सेविकेच्या कुटुंबीयांचे सांत्वन

IND W VS ZIM W 2ND ODI NEWS: हरमनप्रीत दीप्तीची शतके, वैष्णवीची गोलंदाजीत कमाल! झिम्बाब्वेला लोळवत भारताने मालिका खिशात घातली

Dutch Farmers: डच ट्रॅक्टर रस्त्यावर, मागणी संसदेच्या टेबलावर; नायट्रोजन संघर्षाची सात वर्षे; २०३५चे लक्ष्य ठरले, पण डच शेतकऱ्यांना हवी आहे स्पष्टता

SCROLL FOR NEXT