Lalduhoma ZPM eSakal
Election News

Lalduhoma : IPS अधिकारी, इंदिरा गांधींचे सिक्युरिटी चीफ.. अन् आता मिझोरमचे मुख्यमंत्री! कसा आहे लालदुहोमा यांचा प्रवास?

Mizoram Election Results : लालदुहोमा यांच्याकडे राजकारणाचा प्रदीर्घ असा अनुभव आहे.

Sudesh

Mizoram Assembly Election 2023 : मिझोरम विधानसभा निवडणुकांचे निकाल आज जाहीर होत आहेत. याठिकाणी सत्ताधारी MNF ला धोबीपछाड देऊन नवख्या ZPM पक्षाने इतिहास रचला आहे. या विजयाचं संपूर्ण श्रेय पक्षाचे प्रमुख आणि मुख्यमंत्री पदाचे उमेदवार लालदुहोमा यांना दिलं, तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही.

लालदुहोमा यांच्याकडे राजकारणाचा प्रदीर्घ असा अनुभव आहे. सुरुवातीला IPS अधिकारी, मग इंदिरा गांधींचे सिक्युरिटी चीफ, त्यानंतर काँग्रेसमध्ये प्रवेश अन् पुढे स्वतःच्या पक्षाची स्थापना. लालदुहोमा यांचा संपूर्ण प्रवास हा थक्क करणारा आहे. आतापर्यंतचा सर्व अनुभव पणाला लावून त्यांनी ही एकहाती सत्ता मिळवली आहे. मुख्यमंत्री पदासाठी त्यांचाच चेहरा समोर केला जातो आहे.

लालदुहोमा हे नाव मिझोरमच्या लोकांसाठी नवीन नाही. याठिकाणी असलेल्या फुटीरतावादी आणि दहशतवाद्यांवर नियंत्रण आणून शांतता प्रस्थापित करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. ते 1984 साली पहिल्यांदा काँग्रेसच्या तिकिटावरुन खासदार झाले होते. त्यानंतर 1988 साली त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकला. मात्र, यापूर्वीच पक्ष-बदल कायदा लागू झाला होता. या कायद्यामुळे खासदारकी रद्द होणारे लालदुहोमा हे पहिलेच ठरले.

लालदुहोमा यांच्या नावे अनोखा रेकॉर्ड

लालदुहोमा यांनी पुढे झोरम नॅशनलिस्ट पार्टी नावाने स्वतःचा पक्ष उभा केला. यामध्येच आणखी पाच लहान पक्षांना एकत्र घेत त्यांनी झेडपीएम, म्हणजेच झोरम पीपल्स मूव्हमेंट नावाने युती केली. पुढे याच युतीचं पक्षात रुपांतर करण्यात आलं. मात्र, निवडणूक आयोगाने या पक्षाला मान्यता दिली नसल्यामुळे 2018 सालची निवडणूक लालदुहोमा यांनी अपक्ष होऊन लढली. याठिकाणी आमदार म्हणून निवडून आल्यानंतर त्यांच्या पक्षाला मान्यता मिळाली. ते झेडपीएम पक्षाचे अध्यक्ष झाले, मात्र मग त्यामुळे त्यांची विधानसभा सदस्यता रद्द झाली. मिझोरम विधानसभेची सदस्यता गमावणारे पहिले आमदार म्हणून लालदुहोमा यांनाच ओळखलं जातं.

यावर्षी रचला इतिहास

त्यानंतर लालदुहोमा यांनी थेट यावर्षीच्या निवडणुकांवर लक्ष केंद्रित केलं. स्थानिक पातळीवर केलेलं काम, उभारलेला जनसंपर्क आणि राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव या सर्वाचा फायदा लालदुहोमा यांना झाला. त्यांनी कित्येक लोकप्रिय चेहऱ्यांना देखील आपल्यासोबत घेतलं. परिणामी मोठ्या फरकाने त्यांनी यंदाच्या विधानसभा निवडणुकांमध्ये विजय मिळवला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Date Change : इंडियन प्रीमिअर लीग २६ मार्च ऐवजी 'या' तारखेला सुरू होणार; जाणून घ्या त्यामागचं महत्त्वाचं कारण...

Home Loan: ८ वर्षे EMI, ३ थकलेले हप्ते आणि ६० दिवस; १.२ कोटींचे घर गमावले: भारतीय स्वीकारण्यास नकार देत असलेले सर्वात कटू वास्तव

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न

Shahu Mill Memorial : शाहू मिलचा स्मारक आराखडा लवकरच उच्चस्तरीय समितीकडे; राजेश क्षीरसागर यांनी आराखडा सादर करण्याचे दिले आदेश

Central Railway: सिमेंटने भरलेल्या मालगाडीचे ब्रेक अचानक निकामी, उतारावर नियंत्रण सुटलं अन्...; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT