Obesity Sakal
फॅमिली डॉक्टर

विशेष : लठ्ठपणा!

लठ्ठपणा हा एक शास्त्रीय दृष्ट्या आजारच आहे आणि त्याचे अनेक पद्धतीचे परिणाम हे माणसाच्या आयुष्यावर होत असतात.

डॉ. जयश्री तोडकर

शास्त्रीयदृष्ट्या लठ्ठपणा म्हणजे शरीरावर पडणाऱ्या अतिरिक्त वजनाचा भार. लठ्ठपणाचा व्यक्तिच्या वैयक्तिक, सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रावरही मोठा परिणाम होतो. त्यामुळे लठ्ठपणावर वेळीच उपचार करून घेणे आवश्यक असते.

लठ्ठपणा हा एक शास्त्रीय दृष्ट्या आजारच आहे आणि त्याचे अनेक पद्धतीचे परिणाम हे माणसाच्या आयुष्यावर होत असतात. शास्त्रीय भाषेमध्ये कुठल्याही आजारांचे निष्कर्ष बघत असताना वेगवेगळ्या मुद्द्यांनी त्याचा विचार केला जातो.

  • त्या आजाराची व्याख्या

  • त्या आजाराचे शरीरावर होणारे विविध दीर्घकालीन परिणाम.

  • जीवनाचा आनंद घेण्याची कमी झालेली क्षमता.

आज आपण या तीनही गोष्टींचा ऊहापोह या लेखात करणार आहोत.

शास्त्रीयदृष्ट्या लठ्ठपणा म्हणजे शरीरावर पडणाऱ्या अतिरिक्त वजनाचा भार! या वजनाचा शरीरातील वेगवेगळे अवयव आणि त्यांची कार्यक्षमता यांच्यावर परिणाम होतो हे आपण सर्वप्रथम लक्षात घेतले पाहिजे.

शरीरातील वजन आणि शरीराची उंची याचे गुणोत्तर (बी.एम.आय) जेव्हा ‘३० kg/m२’ च्या पुढे जाते तेव्हा शरीराचे वजन शरीरासाठी एक अतिरिक्त भार निर्माण होतो त्याचे गंभीर दुष्परिणाम होतात. यामध्ये हृदयावर पडणारा दाब, सांध्यावर व पाठीच्या मणक्यावर पडणारा दाब, हृदय, किडनी, फुफ्फुस यावर अतिरिक्त येणारा ताण यांचा समावेश होतो. यामुळे मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार, सांध्याची अवेळी झीज, मणक्यांना सूज असे आजार होऊ शकतात.

याबरोबरच आपण हेही लक्षात घेतले पाहिजे की वजन हे शरीरावर केवळ एक बोजा नसून तो अनेक द्रव्यांची खाण असणारा एक अवयव आहे. त्यामधून अनेक प्रकारचे द्रव्य व केमिकल स्त्रवण होत असतात आणि अतिरिक्त चरबीमुळे यात असंतुलन निर्माण होते व साखर पचवण्याच्या क्षमतेत अडथळा निर्माण होतो. वाढत्या वजनामुळे थायरॉईड ग्रंथीला अकाली थकवा येऊन त्या निकामी होऊ शकतात. यालाच ‘हायपोथॉयरॉईडिजम’ असे म्हणतात.

तसेच या वाढत्या वजनामुळे आपल्या पोटावर दाब वाढतो व ‘रेनिन एंजिओ टेन्शन’ नावाच्या कार्यप्रणालीत बिघाड होऊन रक्तदाबाचा गंभीर आजार होतो. त्याच पद्धतीने अंतर ग्रंथींवर परिणाम होऊन माणसाचे लैंगिक जीवन मोठ्या प्रमाणात बिघडते. ते परिणाम दीर्घकालीन असतात. लैंगिक अवयवावर व त्याच्या या कार्यावर दिसणारे परिणाम हे पौगंडावस्थेतील लठ्ठपणा पासूनच सुरू होतात. लठ्ठपणामुळे येणाऱ्या मधुमेहामुळे विशेषतः या लैंगिक क्षमतेवर परिणाम होतो.

या सर्व आजारातील एक सकारात्मक बाब म्हणजे आपण आपले वजन जसे जसे कमी करत जातो तशा तशा या सर्व व्याधी बऱ्या होऊ शकतात व आपण पुन्हा एकदा शरीराचा समतोल साधू शकतो. लठ्ठपणाचा माणसाच्या वैयक्तिक, सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रावरही मोठा परिणाम होतो. त्यांना असणाऱ्या संधी कमी होऊ शकतात असे निदर्शनास आले आहे. अति वजन असणाऱ्या व्यक्तींना हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता सर्वाधिक असते.

त्यामुळे आपण आपल्या वाढत्या वजनाकडे दुर्लक्ष न करता त्याचे आपल्या शरीरावर होणारे वरील सर्व दुष्परिणाम लक्षात घेऊन काळजी घेणे गरजेचे आहे. आपली उंची आणि वय यानुसार संयमित वजन असणारा व्यक्ती दीर्घायुषी होऊ शकतो. हे वजन आटोक्यात आणण्यासाठी काय केले पाहिजे हे आपण पुढील लेखात पाहूया.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT