potato potato
फूड

Tips: बटाटे खरेदी करताना तीन गोष्टींची काळजी घेतली पाहिजे

बाजारात बटाटे खरेदी करताना दुकानदारांवर विश्वास ठेऊन बटाटे खरेदी करतात. असं केल्यास काही सडलेली बटाटेही तुमच्या बाजारात येऊ शकतात

प्रमोद सरवळे

औरंगाबाद: बटाटे ही अशी भाजी आहे जी सर्वांच्या घरी बनवली जाते. बटाट्यांना कोणत्याही भाजीत घालून त्याचे क्लब केले जाऊ शकते. यामूळे बरेच जण आपल्या घरात बटाटे जास्तीचे ठेवतात. बटाट्यांचा एक फायदा म्हणजे ते स्वस्तही असतात आणि ते बरेच दिवस चांगले राहतात. पण जर बटाटेच खराब असतील तर ते स्टोअर करून काहीही फायदा नाही.

बाजारात बटाटे खरेदी करताना दुकानदारांवर विश्वास ठेऊन बटाटे खरेदी करतात. असं केल्यास काही सडलेली बटाटेही तुमच्या बाजारात येऊ शकतात. ज्याची भाजीही चांगली होऊ शकत नाही आणि ते बरेच दिवस टिकू शकतात. चला तर बटाटे खरेदी करताना कोणती काळजी घेतली पाहिजे ते जाणून घेऊया.

१. बटाटे नीट पाहून घ्या-

- बटाटे खरेदी करताना त्याची साल पाहून घ्या. जर वर सुरकुत्या पडल्या असतील तर ती बटाटे खरेदी करणे टाळा. अशा बटाट्यांची भाजी चांगली बनतच नाही तर ते आरोग्यालाही धोकादायक असते.

- जर बटाट्यांवर काळे डाग असतील तर ते बटाटेही खरेदी करणे टाळले पाहिजे. वरीलप्रमाणे बटाट्याच्या आतही काळे डाग असतात..

- कधीही साल निघालेली बटाटे खरेदी करू नये. अशी बटाटे लवकर खराब होतात.

२. बटाट्यांचे वजन आणि साइज-

- मोठ्या आकाराची बटाटे खरेदी करू नये. अशी बटाटे रसायनांचा उपयोग करून वाढवलेली असू शकतात.

- बटाटे नेहमी मध्यम आकाराचेच घ्यावेत. ही बटाट्यांची चवही चांगली असते आणि ते स्टोअर करायलाही सोपे जातात.

- जर लहान आकाराचे बटाटे खरेदी करत असाल तर ती चांगली तयार झाली आहेत का याची खात्री करून खरेदी करावीत.

३. बटाट्यांचा रंग-

- यात बऱ्याच व्हरायटी असतात ज्यांचा रंग हिरवा, लाल, पाढरा आणि पिवळाही असतो. लाल रंगाची बटाटे गोड असतात. तर हिरव्या रंगाची बटाटे कच्ची असतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT