Kothimbir Dhirade Sakal
फूड

माझी रेसिपी : कोथिंबिरीचे धिरडे

कोथिंबीर ही आपल्या रोजच्या वापरातील महत्त्वाची पालेभाजी (वनस्पती) आहे. त्यातल्या त्यात पालेभाज्यांमध्ये अत्यंत गुणी अशी कोथिंबीर ही एक भाजी आहे.

सकाळ वृत्तसेवा

कोथिंबीर ही आपल्या रोजच्या वापरातील महत्त्वाची पालेभाजी (वनस्पती) आहे. त्यातल्या त्यात पालेभाज्यांमध्ये अत्यंत गुणी अशी कोथिंबीर ही एक भाजी आहे. तिचा विशिष्ट असा स्वाद जवळजवळ सगळ्याच पदार्थांची लज्जत वाढवतो. फक्त स्वादच नाही तर एखादा पदार्थ विशेष आकर्षक सजवण्यासाठीदेखील कोथिंबीर सगळ्या वनस्पतींमध्ये भाव खाऊन जाते. कोथिंबीर लोहयुक्त आहे. त्यामुळे रोजच्या स्वयंपाकात कोथिंबिरीचा सढळ वापर असावा. कोथिंबिरीचे धिरडे झटपट बनवून तयार होते आणि चवीला भन्नाट होते.

साहित्य : २ कप कोथिंबीर, १ कप ज्वारीचे पीठ, अर्धा कप बेसन, २ चमचे रवा, ८-१० लसूण पाकळ्या, ४-५ हिरव्या मिरच्या, पाव चमचा हळद, पाव चमचा ओवा, १ चमचा जिरे, १ चमचा लिंबाचा रस, मीठ.

कृती : सर्वप्रथम कोथिंबीर निवडून स्वच्छ धुऊन घ्यावी. मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर, जिरे, ओवा, हिरवी मिरची, लसूण घालून पेस्ट करून घ्यावी. एका बाउलमध्ये ज्वारी, बेसन, रवा घालून एकत्र मिसळून घ्यावे. यामध्ये कोथिंबिरीची पेस्ट घालावी. पाणी घालून सरबरीत पीठ करून घ्यावे. त्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि लिंबाचा रस घालावा. तवा गरम करून त्यामध्ये पळीभर पीठ सोडून धिरडी करून घ्यावीत. चवीला अत्यंत रुचकर होतात ही धिरडी.

टिप : कोथिंबिरीऐवजी देठंपण वापरू शकता. लिंबाचा रस नसेल, तर चमचाभर दहीपण घालू शकता.

- मधुरा बाचल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gujarat High Court: मोदींचं डिग्री प्रकरण! अरविंद केजरीवालांची याचिका फेटाळली, उच्च न्यायालयाने २५ हजारांचा दंड ठेवला कायम

जनता दुष्काळात, तहसीलदार सुट्टीवर; जिल्हाधिकाऱ्यांनी पदभारच काढून घेतला, अधिकारी उरला नावाला

IND vs WI 2nd ODI: मोहम्मद सिराजला खेळण्याची संधी मिळणार, पण कोणाचा पत्ता कट होणार? पाहा संभावित Playing XI

Pune Rain Water : कोट्यवधींच्या कामांनंतरही रस्त्यावर तुंबले पाणी; पावसाने प्रशासनाची पोलखोल

Marathi News Live Updates: सिंहगड ग्रामपंचायतीच्या कामकाजाच्या चौकशीची मागणी

SCROLL FOR NEXT