Matar Amboli Sakal
फूड

माझी रेसिपी : मटार आंबोळी

खरे तर आपली खाद्यसंस्कृती खूप विस्तृत आहे. आता आंबोळीचेच उदाहरण द्यायचे झाले, तर तळकोकणात आंबोळी वेगळ्या पद्धतीने बनवली जाते, तर रायगड जिल्ह्यामध्ये वेगळ्या पद्धतीने.

सकाळ वृत्तसेवा

- मधुरा बाचल

खरे तर आपली खाद्यसंस्कृती खूप विस्तृत आहे. आता आंबोळीचेच उदाहरण द्यायचे झाले, तर तळकोकणात आंबोळी वेगळ्या पद्धतीने बनवली जाते, तर रायगड जिल्ह्यामध्ये वेगळ्या पद्धतीने. आज आपण मालवणमध्ये ज्या पद्धतीने आंबोळी बनवली जाते ती पद्धत बघणार आहोत, त्यामध्ये ताज्या मटारचा वापर करणार आहोत. दिसायला आणि चवीलाही ही आंबोळी भन्नाट लागते आणि मटारऐवजी आवडीनुसार इतर भाज्यांचादेखील वापर करू शकता.

साहित्य :

दोन कप तांदूळ, अर्धा उडदाची डाळ, एक कप तयार भात, अर्धा चमचा मेथी दाणे, मीठ, दीड कप ताजा मटार, ३-४ हिरव्या मिरच्या.

कृती :

  • डाळ आणि तांदूळ एकत्र स्वच्छ धुऊन त्यामध्ये मेथीचे दाणे आणि पाणी घालून ५ तास भिजत घालावे.

  • ५ तासांनंतर भिजलेले डाळ, तांदूळ आणि शिजलेला भात एकत्र मिक्सरमध्ये वाटून घ्यावे. वाटण करताना कमीत कमी पाण्याचा वापर करावा. पीठ थोडेसे घट्टसर ठेवावे. पीठ झाकून कमीत कमी १२-१४ तास आंबवण्यासाठी ठेवून दयावे.

  • दुसऱ्या दिवशी पीठ आंबवून झाल्यावर त्यामध्ये मीठ घालून व्यवस्थित मिसळून घ्यावे.

  • तव्यामध्ये तेल गरम करावे त्यामध्ये मटार, हिरवी मिरची घालून ५-६ मिनिट मटार परतून घ्यावेत.

  • मिक्सरमध्ये मटार घेऊन थोडेसे पाणी घालून पेस्ट करून घ्यावी. ही तयार पेस्ट आंबवलेल्या पिठामध्ये घालून व्यवस्थित एकत्र करून घ्यावे.

  • गरम तव्यावर तेल लावून पळीभर पीठ सोडून आंबोळी झाकण ठेवून २ मिनिटे आंबोळी वाफवून घ्यावी. झाकण काढून खालील पसरवून घ्यावी. बाजूने खरपूस होईपर्यंत भाजून घ्यावी. कोणत्याही चटणी किंवा सॉसबरोबर गरमागरम सर्व्ह करावी.

  • सूचना : शिजलेल्या भाताऐवजी भिजवलेले पोहे घालू शकता. मटार शिजत आला, की त्यामध्ये पालकाची पानंही घालू शकता, म्हणजे आंबोळी आणखी पौष्टिक बनेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajesh Tope: शरद पवार गटाला धक्का? राजेश टोपे खरंच भाजपमध्ये जाणार? अखेर स्वतः टोपेंनीच दिलं स्पष्ट उत्तर!

Konkan Railway: ‘वंदे भारत’, ‘तेजस’च्या फेऱ्यांत १५ जूनपासून कपात; कोकण रेल्वे मार्गावर मॉन्सून वेळापत्रक, गाड्यांच्या वेळाही बदलणार

Uttarakhand Jewellery: मॉडर्न नववधूंची पहिली पसंती! हिमालयाच्या कुशीतील 'या' ५ पारंपरिक दागिन्यांपुढे सोन्याचे हारही फिके!

Vidarbha Weather Update: विदर्भात वादळी पावसाचा ऑरेंज अलर्ट; राज्यभर हवामानाचा बदलता अंदाज, ११ जिल्ह्यांना हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा

Chuda Matar Recipe: सकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट अन् हेल्दी मेन्यू! कमी वेळात बनणाऱ्या 'बनारसी पोह्या'ची पाहा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT