Madhura Bachal Sakal
फूड

माझी रेसिपी : सातूचे तिखट सरबत

सातूचे गोड सरबत सर्रास बनवले जाते; पण ज्यांना गोड आवडत नाही किंवा मधुमेह असल्यामुळे गोड खाऊ शकत नाहीत, त्यांच्यासाठी मस्त, चटपटीत असे सातूचे तिखटसर सरबत.

सकाळ वृत्तसेवा

- मधुरा बाचल

सातूचे गोड सरबत सर्रास बनवले जाते; पण ज्यांना गोड आवडत नाही किंवा मधुमेह असल्यामुळे गोड खाऊ शकत नाहीत, त्यांच्यासाठी मस्त, चटपटीत असे सातूचे तिखटसर सरबत. हे सकाळी न्याहरीसाठी दुसरे काही खाण्याऐवजी घेऊ शकता म्हणजे पोटभरीची न्याहरी होते आणि मुख्य म्हणजे पौष्टिक. अगदी लहानापासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल असं हे सरबत बनतं.

साहित्य : २ चमचे सातूचे पीठ, १ ग्लास पाणी, हिरव्या मिरचीचा तुकडा, २ चमचे लिंबाचा रस, कोथिंबीर बारीक चिरून, १/४ चमचा काळे मीठ, १/४ चमचा जिरेपूड.

कृती :

एका ग्लासमध्ये सातूचे पीठ घ्यावे.

त्यात बारीक चिरलेली हिरवी मिरची घालावी.

त्यावर जिरेपूड, काळे मीठ घालून मिसळून घ्यावे. थोडे थोडे पाणी घालून मिसळून घ्यावे.

सर्वांत शेवटी लिंबाचा रस आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिसळून घ्यावे.

हवे असल्यास बर्फाचा गोळा घालून गटागट पिऊन टाकावे.

सूचना : सगळी तयारी करायचा आळस असेल, तर ग्लासच्या बुडाला मिरचीचा तुकडा, कोथिंबीर, लिंबाची फोड घालून ठेचून घ्यावे. नंतर सातूचे पीठ आणि पाणी मिसळावे. आवडीप्रमाणे मिरपूड, आल्याचा रस घालू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल महागणार नाही; भारत सरकारचा मोठा निर्णय, तेल कंपन्यांची नवी रणनीती काय?

Iran Attack: आखाती देशांवर इराणचे हल्ले; अमेरिका, इस्राईलकडून इराणच्या शिराझ शहरावर ड्रोनचा मारा, नेतान्याहू यांना मारण्याची शपथ!

Dhangar Reservation: धनगर आरक्षणासाठी आझाद मैदानावर उद्यापासून उपोषण; सकाळी दहापासून उपाेषण, आंदोलक मुंबईकडे रवाना!

बीड अल्पवयीन विवाहितेच्या अत्याचार प्रकरणाला वेगळं वळण, पोलीस पाटील अन् ग्रामसेवकावर गुन्हा दाखल होणार

Prakash Abitkar: ‘रेबीज’विरोधी लशींचा पुरेसा साठा: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर; सरकारी, महापालिका रुग्णालयांमध्ये पुरवठा नियमित!

SCROLL FOR NEXT