Lemon Rice Recipe Sakal
फूड

स्वयंपाक बनवायचा कंटाळा आलाय? बनवा 20 मिनिटात साउथ इंडियन डिश

सकाळ डिजिटल टीम

रोज तेच ते खाऊन कंटाळा आलायं? रोजच्या कामातून वेळ मिळत नाही. कधी कधी संध्याकाळी स्वयंपाक बनवायचा कंटाळा येतो. अश्यावेळी बनवा झटपट लेमन राइस. जो खायला ही टेस्टी आणि जिभेचे चोचले पुरवणारा आहे. अगदी कमी वेळेत बनवता येते. ही डिश खरतर साउथ इंडियन आहे.पण आता महाराष्ट्रात ही बऱ्याच कुटुंबात ही डिश बनवली जाते. साउथ इंडियन डिशमध्ये मासाला डोसा, अप्पम,रसम रसम या खास फेमस डिश टेस्टीच नाही तर हेल्दी ही असतात. या प्रत्येक घासाला फ्लेवर टेस्ट जाणवतेच. लेमन राइस ही अशी डिश आहे जी केवळ २० मिनिटांत बनवून तुम्ही खाऊ शकता. चला तर जाणून घेऊया.

साहित्य

तांदूळ, मोहरी तेल, लिंबू, हिरवी मिर्ची, शेंगदाणे, खडा मसाला, हळद पावडर, लाल तिखट, मीठ

कृती :

सुरवातीला भांड्यात मोहरीचे तेल गरम करा. त्यात कडीपत्ता, आल्ले, लाल मिरची, चना डाळ, उडीद डाळ टाकून परतून घ्या.त्यात शेंगदाणे, खडा मसाला, हळद पावडर, लाल तिखट, मीठ टाका. त्यानंतर धुतलेले तांदूळ टाका. त्यात गरम पाणी टाकून पाच मिनिटे शिजवून घ्या. नंतर लिंबू पिळा. तयार भात झाल्यानंतर त्यात कोथिंबीर घाला. गरम गरम लिंबू भात सर्व्ह करा.रोज शिल्लक राहिलेला भात काय करायचा हा प्रश्न नेहमी पडतो. तेव्हा तुम्ही ही रेसीपी ट्राय करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात प्रसिद्ध हॉटेलमध्ये भाकरीत रबरबँड, ग्राहकानं शेअर केला VIDEO

आधी हात पकडला, नंतर कपडे काढत नको ते करण्याचा प्रयत्न, ओला चालकाचं महिलेसोबत गैरकृत्य; मध्यरात्री नवी मुंबईत काय घडलं?

Marathi News Live Updates : एमपीएससीचे विद्यार्थी चर्चेला तयार- सुप्रिया सुळे

बापरे! राणादाने घटवलं तब्बल २५ किलो वजन, व्यायामाबद्दल बोलताना हार्दिक जोशी म्हणाला...

Petrol-Diesel-LPG Rate: अहमदाबादमध्ये पेट्रोल 101 रुपयांवर, महाराष्ट्रात किती? पाहा पेट्रोल-डिझेल अन् LPG सिलेंडरचे ताजे दर

SCROLL FOR NEXT